Next
‘महाराष्ट्र शिवरत्न पुरस्कारा’ने पारख दांपत्य सन्मानित
BOI
Thursday, February 21, 2019 | 03:56 PM
15 0 0
Share this story


पुणे : येथील सामाजिक कार्यकर्ते, प्रवासी महासंघाचे अध्यक्ष व अंनिसचे शाखा अध्यक्ष सुरेश पारख, त्यांच्या मातोश्री चंदनबाई पारख आणि पत्नी व महिला बचत गटाच्या अध्यक्षा मंगला सुरेश पारख यांना शिवजयंतीच्या निमित्ताने ‘महाराष्ट्र शिवरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 

छत्रपती शिवाजी महाराज जयंती व जागतिक मराठी दिनाच्या निमित्ताने १९ फेब्रुवारीला पत्रकार भवनाच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘इंटरनॅशनल ह्युमन पब्लिकेशन’, ‘सा. कोकण भूमी’, ‘समृद्धी प्रकाशन’, ‘विजयदीप सक्सेस’ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय प्रेरणा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या समितीचे अध्यक्ष प्रा. बी. एन. खरात, राज्याचे माहिती संचालक देवेंद्र भुजबळ, पशुवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत भड यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह, अभिलेख, प्रमाणपत्र, पदक, माहिती अंक, शाल, पुष्प देऊन पारख कुटुंबाला सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्धमहायोग पिठाधीश्वर तुळजापूरचे जगदगुरू महास्वामी डॉ. रंगनाथ नाथराव जोशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास संशोधक भा. ल. ठाणगे व अमोल भोसले तसेच डॉ. एन. ए. पाटील, सा. कोकणचे संपादक के. एस. वरक, विजयदिपचे दिपक वोडरे, सुनील धनगर, दिनेश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कारार्थी सुरेश पारख व मंगला पारख या दांपत्याने ३१ वेळा रक्तदान केले व रक्तदान शिबिरांचे आयोजन करून हजारो गरजू रुग्णांना रक्त मिळवून देण्याचे काम केले आहे. याशिवाय मोफत मोतिबिंदू ऑपरेशन शिबिरांचे आयोजन करून हजारो रुग्णांना नवीन दृष्टी मिळवून देण्याचे कार्य करत आहेत. मोफत पाणपोई, बेटी बचाओ - बेटी पढाओ, झाडे लावा - झाडे जगवा, फटाके विरोधी अभियान, व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलन कार्य, प्रवाश्यांच्या व विद्यार्थ्यांच्या अडचणी दुर करणे आदी सामाजिक कार्यांची नोंद घेऊन त्यांना या ‘महाराष्ट्र शिवरत्न पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. त्याबद्दल सर्व सामाजिक शैक्षणिक, धार्मिक आदी स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link