Next
‘संघर्षनायक’ पुरस्कार वितरण सोहळा
BOI
Thursday, February 07, 2019 | 06:15 PM
15 0 0
Share this article:

पुणे : येथील जनता संघर्ष दलाच्या वतीने ‘संघर्षनायक राष्ट्रीय पुरस्कार’ समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. इचलकरंजी येथे खासदार राजू शेट्टी आणि ‘मिसेस इंडिया’ विजेत्या शुभांगी शिंत्रे यांच्या उपस्थितीत हा समारोह होणार आहे. 

रविवारी (१० फेब्रुवारी) इचलकरंजी येथील ‘हॉटेल कॅप्शन्स’ याठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या वर्षीचे संघर्षनायक पुरस्काराचे मानकरी कर्नल सुरेश पाटील (पुणे), ज्येष्ठ विचारवंत प्रा. राजेंद्र कुंभार (जयसिंगपूर), जनता दलाचे राज्य महासचिव प्रताप होगाडे, ज्येष्ठ कामगार नेते शंकर पूजारी (सांगली), संत गाडगे बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक मोहन हर्णे (मुंबई), कविवर्य पाटोलोबा पाटील हे आहेत. 

याशिवाय राज्यस्तरीय संघर्षनायक पुरस्कार सुनील कांबळे (कोल्हापूर), नवे दानवाड गावाच्या लोकनियुक्त सरपंच वंदना कांबळे, खिद्रापूर येथील डॉ. राजश्री राजगौडा-पाटील, इचलकरंजी येथील वैशाली दुर्गाडे यांना प्रदार करण्यात येणार आहे. श्रीफळ, शाल, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Santosh athavale About 150 Days ago
खूप सुंदर बातमी दिल्याबद्ल जनता संघर्ष दल व संघर्षनायक मिडिया आपले आभारी आहे । धन्यवाद। संतोष आठवले Sangharshnayak.com संस्थापक ,संघर्षनायक मिडिया
1
0

Select Language
Share Link
 
Search