Next
‘सिंहगड इन्स्टिट्यूट’तर्फे श्रमसंस्कार शिबिर
प्रेस रिलीज
Saturday, February 02, 2019 | 02:52 PM
15 0 0
Share this storyलोणावळा : येथील सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) विशेष श्रमसंस्कार शिबिर नुकतेच आयोजित केले होते. हे शिबिर मावळ तालुक्यातील वारू-बाह्मणोली गावात झाले.

शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश ओसवाल यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलताना त्यांनी आरोग्याचे महत्त्व, स्वच्छता, प्लास्टिकमुक्त वातावरण व जलसंवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी समाजामध्ये विविध स्तरांवर पोहोचणे गरजेचे असल्याचे सांगितले.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील वैशाली काळे, नारायण भार्गवा ग्रुपचे चेअरमन नारायण भार्गवा, जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख रामराव जगदाळे, ग्रामपंचायत सरपंच मनीष निंबळ, उपसरपंच गणपत निंबळ, पत्रकार भारत काळे, रवी ठाकर, प्रदीप वाडेकर, सचिन ठाकर, नीलेश ठाकर, नामदेव घरदाळे, लोणावळा संकुलाचे संकुल संचालक डॉ. एम. एस. गायकवाड, संकुल व्यवस्थापक पंकज जाधव, संकुल अभियंता विजय वसेकर, प्राचार्य डॉ. आयेशा सिद्दिकी यांसह शिक्षक आणि शिक्षकेतर कमर्चारी उपस्थित होते.या शिबिरात श्रमसंस्कार, स्वच्छता अभियान, लोकजागर, आरोग्य तपासणी, जलयुक्त शिवार, ऊर्जा साक्षरता व संवर्धन, पर्यावरण जनजागृती वृक्ष-जल दिंडी, ऐतिहासिक वसा संवर्धन, शासकीय योजन व त्यांचा लाभ, माती व पाणी परीक्षण, विजेच्या स्त्रोतावर अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत असे उपक्रम व व्याख्याने आयोजित केली होती. या कार्यक्रमाचे नियोजन समन्वयक प्रा. सतीश मेंडके, प्रा. सुमित देवर्षी, प्रा. सौदागर गोडसे यांनी केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link