Next
वा. सी. बेंद्रे, श्री. दा. पानवलकर
BOI
Tuesday, February 13 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘इतिहासाचे भीष्माचार्य’ म्हणून आदराने गौरवले जाणारे वा. सी. बेंद्रे आणि ‘अर्धसत्य’सारख्या दमदार सिनेमाच्या मूळ कथेचे जनक कथाकार श्री. दा. पानवलकर यांचा १३ फेब्रुवारी हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
.....
वासुदेव सीताराम बेंद्रे

१३ फेब्रुवारी १८९४ रोजी पेणमध्ये जन्मलेले वासुदेव सीताराम बेंद्रे म्हणजे ‘इतिहासाचे भीष्माचार्य’ असं ज्यांना आदराने संबोधण्यात येतं, असं भारतातल्या इतिहास संशोधकांमधलं एक दिग्गज व्यक्तिमत्त्व! इतिहास संशोधकांचे मुकुटमणी वि. का. राजवाडे यांना गुरू मानून बेंद्रे यांनी त्यांची संशोधनाची परंपरा एकनिष्ठेने पुढे चालवली. 

शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास अथक संशोधन करून महाराष्ट्रालाच नव्हे, तर जगाला दाखवून देण्याचं अभूतपूर्व कार्य बेंद्रे यांनी केलं आहे. शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेबद्दल त्यांनी अथक संशोधनाअंती सांगितलेली १९ फेब्रुवारी १६३० ही तारीख आता राज्य सरकारतर्फे ग्राह्य धरली गेली आहे. तसंच त्यांनीच परिश्रमान्ती शोधून काढलेलं, डच चित्रकाराने काढलेलं शिवाजी महाराजांचं तैलचित्र आता अधिकृत चित्र म्हणून ओळखलं जातं. संभाजी राजांची पराक्रमी, संकटाला धीरोदात्तपणे तोंड देणारी, धोरणी, मुत्सद्दी अशी तेजस्वी प्रतिमा लोकांसमोर आणण्याचं श्रेय बेंद्रे यांचंच. तसंच संभाजीराजांची वढू गावाची समाधीसुद्धा त्यांनीच शोधून जगासमोर आणली होती.  

त्यांचं ‘साधन चिकित्सा’ हे पुस्तक इतिहास संशोधन करणाऱ्या प्रत्येकाने अभ्यासायला हवं असंच! ऐतिहासिक स्थानांच्या किंवा व्यक्तींच्या दंतकथानुसार न जाता प्रत्यक्ष संशोधनाअन्ती पुराव्यांसह इतिहास उलगडण्याचं अत्यंत सचोटीचं आणि सडेतोड काम त्यांनी आयुष्यभर केलं.

बेंद्रे यांनी चार कोटींहून अधिक पानांच्या पेशवा-दप्तराच्या दस्तऐवजाचं वर्गीकरण आणि जुळणी करण्याचं, तसंच कॅटलॉगिंगचं क्लिष्ट काम पूर्ण केलं. त्यांचं आणखी अत्यंत महत्त्वाचं योगदान म्हणजे संत तुकारामाच्या गाथेत तीन गुरूंचा नामोल्लेख करणाऱ्या केवळ एका अभंगाच्या आधारे त्यांनी त्यांचा साधार शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि महत्त्वपूर्ण माहिती मिळवली. त्यांच्या ग्रंथामुळे संत तुकारामविषयक अभ्यासाला एक स्वतंत्र परिमाण मिळालं आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, Maharashtra Of The Shivshahi Period, शिवराज्याभिषेक प्रयोग, संत तुकारामांचे अप्रकाशित अभंग, छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज चरित्र, साधन-चिकित्सा, तुकाराम महाराज यांचे संत-सांगाती, देहूदर्शन, महाराष्ट्रेतिहासाची साधने, महाराष्ट्रेतिहासाचे संशोधन क्षेत्र व साधनसंपत्ती, राणा जयसिंग आणि शिवाजी महाराज, शीघ्रध्वनी- लेखनपद्धती – मराठी, A Study Of Muslim Inscription, Downfall of  "Angre's Navy", Stenography For India, Tarikh-I-Ilahi : Akbar's Devine Era असे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. 

१६ जुलै १९८६ रोजी त्यांचं निधन झालं. 
................

श्रीकृष्ण दामोदर पानवलकर

१३ फेब्रुवारी १९२८ रोजी सांगली येथे जन्मलेले श्रीकृष्ण दामोदर पानवलकर प्रभावी कथाकार म्हणून मराठी वाचकांना परिचित आहेत. 

हिंदी चित्रपटसृष्टीत गाजलेल्या ‘अर्धसत्य’ या सिनेमाची मूळ कथा त्यांचीच होती आणि त्याबद्दल त्यांना ‘फिल्मफेअर’ पुरस्कारही मिळाला होता. 

त्यांच्या ‘औदुंबर’, ‘सूर्य’ व ‘चिनाब’ या पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला होता.

शूटिंग, एका नृत्याचा जन्म, जांभूळ, गजगा, कांचन अशी त्यांची इतर पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

१९ ऑगस्ट १९८५ रोजी त्यांचा सांगलीमध्ये मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link