Next
दिव्यांगांसाठी राजापूरला स्वावलंबन कार्ड नोंदणी शिबिर
BOI
Tuesday, September 25, 2018 | 06:24 PM
15 0 0
Share this storyरत्नागिरी :
राजापूर बाजारपेठेतील नगर परिषद हॉलमध्ये (पिक अप शेड हॉल) ३० सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी १० वाजता दिव्यांग मेळावा व स्वावलंबन कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राजापूर नगर परिषद व रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांगांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दिव्यांगांना मिळणाऱ्या सवलतींसाठी वेगवेगळी कार्डस् बनवावी लागतात. त्यामुळे एखादे कार्ड नसेल, तर ती सवलत मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने दिव्यांगांसाठी आधार कार्डप्रमाणे स्वावलंबन कार्ड तयार केले आहे. भविष्यात दिव्यांगांना या कार्डच्या माध्यमातून एका कार्डवरच सर्व सोयी-सवलती मिळणार आहेत. म्हणूनच या कार्डसाठी नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

मेळावा व शिबिराचे उद्घाटन राजापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष जमीर खलिपे करणार आहेत. या वेळी मुख्याधिकारी नयन ससाणे, रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे, प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. नोंदणी शिबिराला येताना दिव्यांगांनी अपंगत्व प्रमाणपत्राची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स, रेशन कार्डची झेरॉक्स, शाळा सोडल्याच्या दाखल्याची झेरॉक्स, अलीकडे काढलेला एक फोटो ही कागदपत्रे घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्वावलंबन कार्डचे शुल्क १०० रुपये आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 
सादिक नाकाडे – ८३२९ ५३४९७९
प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे – ९४२२३ ८२१३६
विनायक पवार – ८०८७२ ९७८०९
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link