Next
पाचशिव यात्रेत ७१ तरुणांनी केले रक्तदान
नागेश शिंदे
Thursday, January 10 | 04:54 PM
15 0 0
Share this story



हिमायतनगर : तालुक्यातील पाचशिव महादेव फाटा येथे नऊ जानेवारी २०१९ रोजी युवा प्रतिष्ठान व टायगर ग्रुपच्या बंडूभाऊ अंनगुलवार यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात ७१ तरुणांनी रक्तदान केले.

या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून टायगर ग्रुपचे जिल्हा अध्यक्ष बाळूभाऊ जाधव उपस्थित होते. या वेळी त्यांनी पाचशिव महादेव मंदिरातील महादेवाचे दर्शन घेऊन रक्तदान शिबिरासाठी उपस्थित असलेल्या युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश दिला; तसेच रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असल्याचे सांगून रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. या वेळी त्यांनी टायगर ग्रुपच्या कार्याविषयी माहिती दिली.



टायगर ग्रुपचे बंडूभाऊ अंनगुलवार यांच्या संकल्पनेतून वयोवृद्धांना सार्वजनिक ठिकाणी बसण्यासाठी स्वखर्चातून १५ बेंच बांधण्यात आले. त्याचे उद्घाटनही या प्रसंगी जाधव व यात्रा कमिटीचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांच्या हस्ते करण्यात आले. हे बेंच मंदिर परिसर, कॉलेज परिसर व  बसस्टँड परिसरात बसविण्यात आले आहेत.

या वेळी पाचशिव यात्रा कमिटीचे अध्यक्ष गोपतवाड, पत्रकार अनिल मादसवार, साईनाथ धोबे, सोपान बोंपिलवार, दिलीप शिंदे, नागेश शिंदे, विपुल दंडेवाड, योगेश चिल्कावार, नगरसेवक विनायक मेंडके, शुभम दंडेवाड, अरविंद वानखेडे, शुभम हरडपकर, सतीश गोपतवाड यांच्यासह टायगर ग्रुपचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link