Next
‘क्षण’ फोटोग्राफी प्रदर्शन २३ मार्चपासून
प्रेस रिलीज
Tuesday, March 20, 2018 | 12:09 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘स्टारविन्स इंटरटेमेंट व कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्यातर्फे ‘क्षण’ या फोटोग्राफी प्रदर्शनाचे आयोजन २३ ते २५ मार्च दरम्यान राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी, घोले रोड येथे करण्यात येणार आहे,’ अशी माहिती प्रदर्शनाचे आयोजक व स्टारविन्स इंटरटेमेंटचे सहसंस्थापक प्रणव तावरे यांनी दिली.  

या वेळी ‘स्टारविन्स’चे सहसंस्थापक राज लोखंडे, प्रथमेश खारगे, श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रदर्शनाविषयी बोलताना तावरे म्हणाले की, ‘छायाचित्रकार जयेश दुणाखे यांच्या स्मरणार्थ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. प्रदर्शनाचे हे तिसरे वर्ष असून, प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता माजी राज्यमंत्री विजय कोलते, झील एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी संचालक जयेश काटकर व प्रसिद्ध छायाचित्रकार मिलिंद ढेरे व गणेश भोर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

लोखंडे म्हणाले, ‘गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रदर्शनाला भारतातील सर्वच भागातील छायाचित्रकारांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे, मुंबई, नागपूर, इंदोर, कोलकता, बंगळुरू, दिल्ली अशा वेगवेगळ्या शहरातून छायाचित्रकारांनी आपली छायाचित्रे या प्रदर्शनासाठी पाठवली आहेत. प्रदर्शनासाठी एकूण ५५ छायाचित्रकारांची १४१ छायचित्रे आपण प्रदर्शित करत आहोत. ‘क्षण फोटोग्राफी’कडून या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या युवा छायाचित्रकारांना एक हक्काच व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.’

प्रदर्शनाविषयी अधिक माहिती देताना खारगे म्हणाले, ‘या वर्षी प्रदर्शनासाठी सहा विषयांची निवड करण्यात आली होती. यामध्ये प्री-वेडिंग, प्रस्पेक्टीव्ह फोटोग्राफी, आइज फोटोग्राफी, ब्लँक आणि व्हाईट, ओल्ड बिल्डिंग अँड आर्किटेक्चर, सी-स्केप या विषयांचा समावेश होता.’

‘क्षण पुरस्कार २०१८चे वितरण
या निमित्ताने प्रथमच ‘क्षण पुरस्कारां’चे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये शिववर्धन ढोल-ताशा पथकाचे केतन कंक, टाईम्स ग्रुपचे छायाचित्रकार मंदार देशपांडे, मैत्र युवा फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे, झील एज्युकेशन सोसायटीचे कँपस डायरेक्टर संजय देवकर, ढोल-ताशा वादक अथर्व कुलकर्णी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारांचे वितरण व प्रदर्शनातील सर्वोत्तम छायाचित्रकरांना २५ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात गौरविण्यात येईल.

प्रदर्शनाविषयी :
दिवस : २३ ते २५ मार्च २०१८
उद्घाटन : सकाळी ११ वाजता
वेळ : सकाळी ११ ते रात्री आठपर्यंत
स्थळ : राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी, घोले रोड, पुणे
पुरस्कार वितरण :
दिवस : २५ मार्च २०१८
वेळ : सायंकाळी सहा वाजता
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link