Next
‘सुपर ३०’ येणार २६ जुलैला
BOI
Tuesday, February 12, 2019 | 06:11 PM
15 0 0
Share this story


मुंबई : बॉलीवूड अभिनेता ह्रतिक रोशन याचा बहुचर्चित चित्रपट ‘सुपर ३०’च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. येत्या २६ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून यापूर्वी हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार होता. 

अभिनेता ह्रतिक रोशन सध्या चर्चेत आहे, तो त्याच्या या बहुचर्चित चित्रपट ‘सुपर ३०’मुळे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलून तो आता २६ जुलैला प्रदर्शित होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान हा चित्रपट आधी २५ जानेवारीला प्रदर्शित होणार होता, परंतु २५ जानेवारीला बॉलीवूडमधील ‘ठाकरे’ आणि ‘मणिकर्णिका’ हे दोन बड्या बॅनरचे चित्रपट प्रदर्शित होणार होते. त्यामुळे चित्रपटाची प्रदर्शन तारीख पुढे करणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. 

‘सुपर ३०’ या चित्रपटाची कथा म्हणजे पटनामधील आनंद कुमार यांची कहानी आहे, जे दर वर्षी आर्थिक दृष्ट्या गरीब ३० मुलांना आयआयटी-जेईई परीक्षेची शिकवणी देतात. त्यांना परीक्षा देण्यासाठी तयार करतात. भारतीय प्राद्योगिक संस्था (आयआयटी)च्या प्रवेश परीक्षेची तयारी करून घेणारी संस्था म्हणून ‘सुपर ३०’ या संस्थेची ओळख आहे. ही संस्था आणि तिचे कार्य यावर हा चित्रपट आधारित आहे. अभिनेता ह्रतिक रोशन रोशन हा ‘सुपर ३०’चे आनंद कुमार यांच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपट येण्याआधीच सर्वांमध्ये या चित्रपटाबाबत खूप उत्सुकता असल्याचे पाहायला मिळत आहे. सप्टेंबरमध्ये ‘शिक्षक दिना’च्या दिवशी या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. 

दिग्दर्शक विकास बहल या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धूरा सांभाळत असून ‘रिलायंस एन्टरटेन्मेंट’ आणि ‘नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेन्मेंट’ यांच्या बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होत आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link