Next
‘एस संशोधन’तर्फे ‘सुबप’ व ‘सुबप प्लस’ सादर
प्रेस रिलीज
Monday, November 19, 2018 | 03:49 PM
15 0 0
Share this story

पुणे : येथील एस संशोधन संस्थेतर्फे सर्व प्रकारच्या मुत्रमार्ग विकारांवर चालू असलेल्या उपचार किंवा औषधांबरोबर पूरक औषध म्हणून ‘सुबप’ व ‘सुबप प्लस’ सादर करण्यात आले पुण्यातील प्रख्यात मुत्रविकारतज्ञ डॉ. सुरेश पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली या औषधांची निर्मिती करण्यात आली आहे.

या औषधांना अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) मान्यताप्राप्त झाली असून, ‘सुबप’ला भारतीय पेटंट, तर ‘सुबप प्लस’ला २०१६मध्ये युएस पेटंट आणि २०१७मध्ये युरोपियन पेटंट प्राप्त झाले आहे. युरोपियन पेटंटला युके, जर्मनी, फ्रान्स अशा देशांमध्ये प्रमाणन प्राप्त झाले आहे.

याबाबत बोलताना डॉ. पाटणकर म्हणाले, ‘आधुनिक व वैज्ञानिक पद्धतीने यावर संशोधन केले गेले आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व नियम वापरून, तसेच चाचण्या करून आयुर्वेदिक तत्त्वांचा आधार घेऊन १० वर्षांच्या प्रयत्नांनंतर याची निर्मिती करण्यात आली आहे. शरीर प्रकृती, बदलती जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे मुत्रमार्गातील विकार भारतात वाढत आहेत. मुत्रमार्गाच्या विकारात पोटात दुखणे, मुत्रमार्गाचा दाह, जंतूसंसर्ग, रक्तस्त्राव, मुत्रविसर्जनात अडचणी निर्माण होणे ही सर्वसामान्य लक्षणे दिसून येतात. मुत्रमार्गातील विकारामधील सध्याच्या उपचारपद्धतीमध्ये आवश्यकता असल्यास शस्त्रक्रिया, प्रतिजैविके, वेदनाशामक औषधे, मुत्राशयावर कार्य करणारी औषधे यांचा समावेश आहे. ‘सुबप’ हे अशा सर्व विकारांवर चालू असलेल्या उपचारांवर पूरक व परिणामकारक औषध म्हणून काम करते.’

‘दुसरीकडे अगदी छोट्या मुतखड्यांच्या उपचारासाठी बरेचवेळा शस्त्रक्रिया शक्य नसते. अशा वेळेस ‘सुबप प्लस’ उपयुक्त ठरते. त्याचबरोबर छोट्या व मोठ्या मुतखडयांमुळे मुत्रपिंडाच्या पेशींना झालेली इजा भरून काढण्यात मदत होते व ती परत होऊ नये यासाठी देखील परिणामकारक ठरते. अशा प्रकारचे बहुधा हे एकमेव औषध आहे. ही औषधे आजवर पाच हजारांहून अधिक मुत्रविकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांनी घेतली असून, त्याचा फायदा त्यांना झाला आहे,’ असे डॉ. पाटणकर यांनी सांगितले.

‘सुबप’ व ‘सुबप प्लस’च्या माहितीचे सादरीकरण डॉ. पाटणकर यांनी ऑल इंडिया युरोलॉजी सोसायटी ऑफ इंडिया व अमेरिकन युरोलॉजी असोसिएशनच्या परिषदांमध्ये केले होते व त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या दोन्ही औषधांचे वितरण श्रीपाद मेडिसर्चतर्फे करण्यात येत आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link