Next
‘आयएसबीएस’ला ‘एनआयआरएफ’ रँकिंगमध्ये वरचे स्थान
प्रेस रिलीज
Thursday, June 13, 2019 | 06:06 PM
15 0 0
Share this article:

पुणे : श्री चाणक्य एज्युकेशन सोसायटीच्या इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजला (आयएसबीएस) ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क २०१९’च्या (एनआयआरएफ) यादीत उच्च क्रमांकावर स्थान मिळाले आहे. ‘एनआयआरएफ’ रँकिंग हे देशभरातील शैक्षणिक संस्थांच्या गुणवत्तेची प्रतवारी दर्शवते.   

‘आयएसबीएस’तर्फे व्यवस्थापनातील ‘पीजीडीएम’ आणि ‘एमबीए’ हे अभ्यासक्रम चालवले जातात. संस्थेला मिळालेल्या ‘एनआयआरएफ’ रँकिंग व्यतिरिक्त संस्थेच्या एमबीए अभ्यासक्रमास नुकतेच ‘नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिटेशन’कडून (एनबीए) २०१९ ते २०२२ पर्यंत मान्यता मिळाली आहे. ‘आयएसबीएस’ ही संस्था २००६मध्ये सुरू झाली असून, २०१३मध्ये संस्थेच्या एमबीए अभ्यसक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची संलग्नता मिळाली आहे. 

‘आयएसबीएस’च्या संचालक डॉ. रेणू भार्गव म्हणाल्या, ‘इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असून, डॉ. तरिता शंकर आणि प्रा. चेतन वाकळकर यांच्या नेतृत्त्वाखाली या संस्थांनी अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. ‘आयएसबीएस’मधील शिक्षणाची ‘एनबीए’ आणि ‘एनआयआरएफ’सारख्या महत्त्वाच्या यंत्रणांकडून दखल घेतली जाणे ही येथील व्यवस्थापन शिक्षणाच्या दृष्टीने उल्लेखनीय बाब आहे. या ठिकाणच्या व्यवस्थापन शिक्षणाचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात उपयोग व्हावा यासाठी आम्ही विशेष लक्ष देतो.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search