Next
भारतीयांच्या मापाच्या आरामदायी पादत्राणांना पेटंट
मधुमेहींसह विविध रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त; धनंजय केळकर यांची कामगिरी
BOI
Thursday, August 23, 2018 | 05:27 PM
15 0 0
Share this article:

‘सेफ्फशू’ला मिळालेल्या पेटंटबाबत माहिती देताना धनंजय केळकर

पुणे : ‘आपके पाँव बहुत हसीन है, इन्हे जमीं पर मत रखना’ हा ‘पाकिज़ा’ चित्रपटातील संवाद सर्वांनाच माहीत आहे. प्रत्यक्षात मात्र पाय जमिनीवर ठेवण्यावाचून पर्याय नसतो. पायांच्या सौंदर्यासाठी काळजी घेतली जात असली, तरी पादत्राणांची निवड करताना त्यांच्या योग्यतेपेक्षा सुंदरतेकडे लक्ष दिले जाते. मधुमेहासारखा विकार असलेल्यांना तर पायांची अतीव काळजी घ्यावी लागते. या पार्श्वभूमीवर, मुंबईतील धनंजय केळकर यांनी भारतीयांच्या पायांच्या मानकांनुसार योग्य प्रकारची आरामदायी पादत्राणे बनविण्याचे तंत्र विकसित केले आहे. तसेच ११ वर्षांच्या प्रयत्नांनंतर त्यांना या संशोधनाचे पेटंटही मिळाले आहे. त्यांच्या उत्पादनाचे नाव ‘सेफ्फशू’ असे असून, या फुटवेअरच्या वापरामुळे सर्वसामान्यांसह मुख्यतः मधुमेही, तसेच संधिवात, गुडघेदुखी आणि टाचदुखीच्या रुग्णांचा त्रास कमी होणार आहे.

पादत्राणे बनविताना याही गोष्टींचा विचार
मधुमेहासारख्या विकार असलेल्यांच्या पायाला जखमा झाल्या, तर पाय काढण्याची वेळही येते; पण तरीही योग्य प्रकारची पादत्राणे निवडण्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही; पण योग्य पादत्राणे वापरल्याने आपले आरोग्य चांगले राहू शकते, हे केळकर यांनी सिद्ध केले आहे. व्यक्तीच्या पायाच्या मापांबरोबरच उभे राहण्याची, चालण्याची त्याची पद्धत, पायातील दोष या गोष्टींचाही विचार करून त्याच्या पायाचा नंबर ठरवला जातो आणि हे फुटवेअर बनवले जाते. आपल्या पायांना अनुरुप अशी पादत्राणे मिळाल्यामुळे चालण्यात सहजता तर येतेच, पण पायाच्या कुठल्याही भागावर अनावश्यक दाब पडत नाही, हे ‘सेफ्फशू’चे वैशिष्ट्य आहे. ते लक्षात घेऊनच दोन मे २०१८ रोजी भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने या उत्पादनाला पेटंट दिले. बहुतांश लागणाऱ्या सतराशे फुटवेअरचे आकृतिबंध ‘सेफ्फशू’ कंपनीत तयार असतात.

भारतीयांच्या पायात विविधता, पादत्राणांत मात्र नाही
याबाबत धनंजय केळकर यांनी पुण्यात माहिती दिली. ते म्हणाले, ‘पूर्वी भारतात पायाची मापे घेऊन चपला-बूट बनवले जात असत; पण तयार फुटवेअर बाजारात येऊ लागल्यावर मापाने बूट-चपला बनवून देणाऱ्यांचा व्यवसाय मागे पडला. उष्ण प्रदेशात पाय उघडे राहणारी पादत्राणेच जास्त बनवली जातात. तेथील लोकांचे पाय खूपच रुंद असतात. परदेशी मानकांपेक्षा भारतीय पाय हे दोन ते ५० मिलिमीटरने रुंद असतात. थंड प्रदेशात शूज अधिक वापरले जातात. अशा परदेशी मानकांवर आधारित बनलेले शूज भारतीय पायात घालत असताना पाय त्यात कोंबावे लागतात. परदेशात १०-१२ नंबरचेच शूज मिळतात. अशा प्रस्थापित मानकांनुसार लांबी, रुंदी, आकार, प्रकार यांप्रमाणे दुकानात एकाच डिझाइनची दहा हजार प्रकारची पादत्राणे ठेवावी लागतील, इतकी विविधता भारतीयांच्या पायांत आहे. मापाप्रमाणे फुटवेअर बनवायला अतिकुशल कारागीर लागतात. त्यामुळे ते बनवणे खर्चिक होते. त्यामुळे आपल्याकडे सरसकट परदेशी मानकांनुसार फक्त वेगवेगळ्या मापाचे फुटवेअर बनवले जाते. अशा प्रकारचे फुटवेअर वापरणे अनेक आजारांना आमंत्रण देते; पण हे फारसे कोणाला माहिती नसते.’


‘जे फुटवेअर घातल्यानंतर आपण वेगाने आरामात चालू शकतो, अडखळत चालत नाही, ते योग्य फुटवेअर,’ अशी साधी व्याख्याही केळकर यांनी सांगितली. 
‘भारतात तीन-चार प्रमुख आणि दोन तुरळक असे पायांचे आकार आहेत. तसेच भारतीय पाय बऱ्यापैकी रुंद असतात आणि परदेशी मानकांवर आधारित फुटवेअर एकाच आकाराच्या पायांवर बेतलेले असते. त्यामुळे बहुतेक भारतीयांना ही पादत्राणे सोयीस्कर नाहीत. मधुमेहामुळे होणारा मज्जातंतूंचा ऱ्हास आणि संधिवात यांमुळे पायांचे आकार बदलले, तर आधीच सोयीस्कर नसलेली पादत्राणे अधिकच त्रासदायक होतात. त्यामुळे पाय दुखणे आणि मधुमेहात पायांना जखमा होण्याचे प्रमाण वाढते. मधुमेही रुग्णाला डायबेटिक फूट अल्सर झाल्यास ते अत्यंत खर्चिक आणि त्रासदायक असते. बरेचदा त्यामुळे पाय कापावाही लागू शकतो. हे टाळण्यासाठी सुयोग्य फुटवेअर घालणे आवश्यक असते,’ असेही त्यांनी नमूद केले.

योग्य पादत्राणांसाठी संशोधन
‘मी संशोधन करून प्रत्येक व्यक्तीच्या पायाची रचना, चालण्याचा वेग, पडणारा दाब अशा विविध बाबींचा अभ्यास करून, पायाची मोजमापे घेऊन फुटवेअर बनविण्याचे तंत्र विकसित केले. २००६पासून मुंबईत त्याचे उत्पादन सुरू केले. त्यात घरात घालण्यासाठीचे, बाहेर चालण्यासाठीचे फुटवेअर आहे. यामध्ये पावलांवर पडणारा जास्तीचा दाब सगळीकडे सारखा पसरवण्यासाठी ‘प्रेशर सॉक’ असतो. बाजारात मिळणाऱ्या सर्वसाधारण फुटवेअरमध्ये त्यासाठी पुरेशी जागा नसते आणि त्यात सगळे पाऊल न दाबता मावतही नाही. त्यामुळे चालणे कमी होते, आपोआप शारीरिक हालचाली मंदावतात आणि आजार वाढतच जातो. योग्य फुटवेअर वापरले, तर ती व्यक्ती आरामात चालू शकते, तिचा आत्मविश्वास दुणावतो, मन आनंदी राहते, पर्यायाने शरीर उपचारांना चांगला प्रतिसाद देते आणि आजारातून बाहेर पडण्यास मदत होते; पण या सगळ्यात फुटवेअर इतके महत्त्वाचे ठरते, हेच मान्य करण्यास लोक तयार नसतात, ही खेदाची बाब आहे. ‘योग्य फुटवेअर वापरा, नाहीतर ऑपरेशन करावे लागेल,’ असे अस्थिरोगतज्ज्ञ सांगतात, तेव्हा रुग्ण अशा वेगळ्या फुटवेअरकडे वळतात. अन्यथा दुर्लक्षच केले जाते,’ असे केळकर यांनी सांगितले. 

‘या’ नामवंतांना पटले ‘सेफ्फशू’चे महत्त्व
केळकर यांच्या ‘सेफ्फ शू’च्या काही ग्राहकांमध्ये फारमॅकॉलॉजी पुस्तकाचे सहलेखक डॉ. एस. डी. भांडारकर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार गजानन कीर्तिकर, आसाममधील अत्तराचे उत्पादक आणि खासदार अजमल, आमदार पराग अळवणी आदी नामवंतांचा आणि सुमारे साठ हजार भारतीयांचा समावेश आहे. या विषयावर मार्गदर्शन करणारे ‘चला, चालू या’ हे पुस्तकही केळकर यांनी लिहिले असून, ते ‘बुकगंगा डॉट कॉम’वर मोफत उपलब्ध आहे. (ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) केळकर यांच्या ‘धनसई लॅबोरेटरीज’ने याआधी विकसित केलेली सेन्सिटोमीटर व्हीपीटी, एचसीपी आदी उपकरणेही मधुमेहींसाठी अत्यंत उपयुक्त ठरली आहेत. 

अधिक माहितीसाठी वेबसाइट :  https://www.seffshoe.com/ 

(सोबतचा व्हिडिओ पाहा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
DHANANJAY PAWAR About 289 Days ago
I need your help of mr dhananjay kelkar for my son footware. So kindly provide me details of contact
2
0
Nailesh mehta About 289 Days ago
Well . I m diabetic n amputed fingers on left fingers..one day i came across via google for my shoes.i visited n had a deep chat with mrs n mr kelkar. I m impressed by the presentation .. so i ordered one of the shoes..i m definetly satisfied by his work n dedication for preparing the right type of shoes..today i m wearing his shoes n is totalli satisfied n comfortable by his work ..i have very good experience n use to wear daily n it becomes very easier to wear .even my left toe n first three fingers r amputed.. but a real gem person who takes interest in each n every patient .. n for those who do not have diabetes..good for varicose veins issue also.. hats off to this person for genuine work
2
0
Madhavi kavishwar About 296 Days ago
Khup abhinandan
2
0
Asim About 298 Days ago
Nileah Mestry Jyana diabetes nahi tyanchya sathi pan he shoes, sandals ani slipons aahet. Vijay Deshmukh for sales plz call 9833410235
2
0
Dr.Varsha Dandawate About 298 Days ago
It is very admirable to see your hardwork of so many years getting converted into a solid patented base . Lots of best wishes !
2
0
Nilesh Mestry About 298 Days ago
Jyana diabetes nahi asha vyaktina vaparta yenare shoes kiva chappal miltatat ka? Ki phakt rugnasathi
3
0
Pathade Rameshwar About 298 Days ago
Diabetic use shues centere Aurangabad place
2
0
Kishor pai About 299 Days ago
Good one for all public suffreing in difrent deses.congratulation to your future dream
3
1
Vijay Deshmukh, Dabadgaonkar About 299 Days ago
Whether we can establish sale depot in Latur.What are the conditions? Congratulations for getting petant & Also for efforts taken in innovation
3
0

Select Language
Share Link
 
Search