Next
बजाज अलायन्झतर्फे ‘मोसंबी’ डिजिटल शाखांचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Tuesday, December 12 | 05:59 PM
15 0 0
Share this story

पुणे : बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्स कंपनीने, ग्राहक सेवा अधिक चांगली करण्यासाठी  ‘मोसंबी’ हे आधुनिक सुविधा दाखल केली आहे. ‘मोसंबी’ हे हातात मावण्याजोगे उपकरण असून, ते मोबाइल शाखेच्या सर्व सेवा देते. यामध्ये प्रीमियम देयकांची प्रमाणपत्र मिळवणे, खात्यांची स्टेटमेंट मिळवणे, विम्यांची नवीकरणीय प्रीमियम भरणे, क्लेम स्टेटस तपासणे, शाखा शोधणे, पॅन आणि आधार तपशील नव्याने भरण्यासाठी एसएमएस सेवा, मोबाइल क्रमांक, इमेल आयडी फंड मूल्य आणि खात्यांची स्टेटमेंट, बोनस स्टेटमेंट आणि क्लेम स्टेटस, विक्रीच्या चौकशीसाठी आणि सेवांशी संबंधित प्रश्नांसाठी संपर्क तपशील भरणे अशा सर्व  सेवा ग्राहकांना मिळतात.  

यातील महत्त्वाचा फायदा म्हणजे ग्राहक नवीकरणीय प्रीमियमची देयके यातून भरू शकतात, चेक, डीडी आणि नॉन चिप आधारित क्रेडिट आणि डेबिट कार्ड, ऑनलाइन देयके अशी सर्व प्रकारची देयके देता येतात. याशिवाय लवकरच इ-वॉलेटचा पर्यायसुद्धा उपलब्ध होणार आहे.

याबाबत अधिक माहिती देताना बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्स कंपनीचे सीईओ तरुण चुघ म्हणाले, ‘या उपक्रमासाठी या उद्योगक्षेत्रातील पहिले पाऊल उचलणारी आमची कंपनी, आमच्या ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार परिपूर्ण सेवा मिळावी, यासाठी वचनबद्ध आहे. या सेवेअंतर्गत ग्राहकांना आपला वेळ अधिक चांगल्या प्रकारे घालवता येईल आणि कुठल्याही सेवांसाठी प्रत्यक्ष शाखेत जावे लागणार नाही.’

कंपनीने अलिकडेच व्हर्च्युअल चॅट असिस्टंट `बोईंग'आता वेबसाइटशिवाय कंपनीच्या फेसबुक पेजवर ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link