Next
‘चांगल्या आरोग्यासाठी सायकल आवश्यक’
BOI
Monday, October 09 | 12:51 PM
15 0 0
Share this story

चंद्रकांत पाटीलकोल्हापूर : ‘चांगल्या आरोग्यासाठी घरोघरी सायकल आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील केले.

कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबतर्फे सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅलीच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

पाटील म्हणाले, ‘आरोग्याच्या दृष्टीने सायकलिंगचे महत्त्व ओळखणे आवश्यक आहे. पर्यावरण प्रदूषण रोखायचे असेल, तर सायकल उपयुक्त आहे. देशातील अनेक शहरांत सायकलसाठी स्वतंत्र ट्रॅक होत आहेत. प्रदूषण नियंत्रणासाठी आठवड्यातून एक दिवस ‘नो व्हेईकल डे’ करणे महत्त्वपूर्ण आहे. नागरिकांनी खासगी वाहनांचा वापर टाळून शक्यतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अवलंब करावा.’

या वेळी इंडिया, आशिया आणि युनिक बुक ऑफ रेकॉर्ड नोंदविणारा संभाजीनगर येथील सहा वर्षीय वरद चंदगडकर व पृथ्वीराज शहापुरे यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, शहर वाहतूक पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष चेतन चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. विजय कुलकर्णी, सचिव उदय पाटील, विश्वविजय खानविलकर, नगरसेवक राहुल माने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link