Next
जिम डेव्हिस
BOI
Saturday, July 28, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘गारफिल्ड’ या लठ्ठ, आळशी आणि आत्मकेंद्री बोक्याच्या कार्टूनचा जन्मदाता जिम डेव्हिसचा २८ जुलै हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय...
....
२८ जुलै १९४५ रोजी इंडियानामध्ये जन्मलेला जिम डेव्हिस हा कार्टूनिस्ट, लेखक, निर्माता आणि नाटककार म्हणून प्रसिद्ध आहे. लहानपणी वडिलांच्या फार्मवर राहत असताना, अंगभूत दम्यामुळे बाहेरची भटकंती थांबवून त्याला घरातच डांबून राहायला लागलं. त्या घरकोंबड्या अवस्थेत त्याने आजूबाजूच्या मांजरांचं केलेलं निरीक्षण पुढे त्याला आपल्या कार्टून स्ट्रिप्समधून अचूकपणे मांडता आलं. त्यामुळे त्याच्या कार्टून स्ट्रिप्स पाहतापाहता लोकप्रिय होत गेल्या. सुरुवातीच्या काळात, १९६९च्या सुमाराला, टॉम रायनला ‘टंबलवीड्स’साठी साह्य करत असताना त्याने ‘नॉर्म नॅट’ (Gnorm Gnat) ही कार्टून मालिका बनवली. आणि दहाच वर्षांत त्याच्या जगप्रसिद्ध ‘गारफिल्ड’ या लठ्ठ, आळशी आणि आत्मकेंद्री बोक्याच्या कार्टूनचा जन्म झाला. गारफिल्डच्या कॉमिक स्ट्रिप्स अफाट लोकप्रिय झाल्या. एका इटालियन रेस्तराँमध्ये जन्मलेला हा बोका आणि त्याच्या कार्टूनिस्ट मालकाच्या मजेशीर आयुष्याची लोकांना भुरळ पडली. अल्पावधीतच त्याची कॉमिक स्ट्रिप शंभरहून जास्त वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली. या बोक्यावर अनेक सिनेमे निघाले, कार्टून स्ट्रिप्सव्यतिरिक्त अनेक पुस्तकं निघाली, की-चेन्स, मग्स, टी-शर्टस्, बॅग्ज, वॉटर बॉटल्स, सगळीकडे गारफिल्डच्या वेगवेगळ्या पोझेस दिसायला लागल्या आणि त्याची लोकप्रियता वाढतच गेली. आज चाळीस वर्षांनंतरही ही कार्टून स्ट्रिप अडीच हजारांहून अधिक वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होते आणि त्याचे अब्जाहून जास्त वाचक आहेत. याव्यतिरिक्त डेव्हिसच्या ‘ऑरसन्स फार्म’ आणि ‘मिस्टर पोटॅटो हेड’ या कार्टून स्ट्रिप्स प्रसिद्ध आहेत. 

यांचाही आज जन्मदिन :
बालसाहित्यकार बाबा भांड (जन्म : २८ जुलै १९४९) 
‘पीटर रॅबिट’ची जन्मदात्री बिअट्रिक्स पॉटर (जन्म : २८ जुलै १८६६, मृत्यू : २२ डिसेंबर १९४३) 
(यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link