Next
‘पर्सिस्टंट’तर्फे वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन
प्रेस रिलीज
Saturday, April 20, 2019 | 02:19 PM
15 0 0
Share this article:


पुणे : आरोग्य, शिक्षण आणि सामुदायिक विकास या क्षेत्रांमध्ये सामाजिक परिवर्तन घडविणार्‍या पर्सिस्टंट फाउंडेशनला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पर्सिस्टंट सिस्टिम्स लिमिटेडने या फाउंडेशनच्या कार्याची बीजे १९९५पासूनच रोवली होती आणि या फाउंडेशनची स्थापना अधिकृतरित्या २००९मध्ये झाली. पर्सिस्टंट फाउंडेशनचा प्रवास ४०हून अधिक सामाजिक संस्थांशी सहयोग करून सुरू झाला, ज्यामध्ये समाज परिवर्तनावर लक्ष केंद्रित केले गेले. १९९५मध्ये टाकलेल्या छोट्या पावलांपासून आजवर पडलेल्या प्रभावाचे अधिकृत मूल्यमापन २०१८मध्ये पूर्ण करण्यापर्यंत पर्सिस्टंट फाउंडेशनने सामाजिक विकास केंद्रस्थानी ठेऊन अनेक उपक्रम राबविले आहेत.


१० वर्षांचा हा टप्पा साजरा करण्यासाठी पर्सिस्टंट फाउंडेशन वर्षभर विविध उपक्रम हाती घेणार असून, याची सुरुवात पुणे येथील पर्सिस्टंट सिस्टिम्स येथे काही निवडक कंपन्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रकल्प (सीएसआर) प्रदर्शित करण्यापासून झाली. वर्षभर घेण्यात येणार्‍या उपक्रमांमध्ये विचारांची देवाण-घेवाण, एनजीओज व फाउंडेशनच्या कार्यक्षेत्रात काम करणार्‍या विविध कंपन्यांच्या सीएसआर विभागाच्या सर्वोत्तम कार्यपद्धतीची देवाण-घेवाण यांचा समावेश आहे. हे सर्व उपक्रम पर्सिस्टंटच्या भारतातील केंद्रामध्ये होणार असून, फाउंडेशनच्या मूळ कार्यक्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांचादेखील सहभाग असेल.

पर्सिस्टंट सिस्टिम्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे म्हणाले, ‘पर्सिस्टंट सिस्टिम्समध्ये हा आमचा ठाम विश्‍वास आहे, कंपनी व आपले कर्मचारी हे समाजाचा एक अविभाज्य भाग आहे आणि ही आपली नैतिक जबाबदारी आहे, की आपण ज्या जगात राहतो त्याच्यासाठी काहीतरी चांगले कार्य करावे. आमचे प्रयत्न हे १९९५मध्ये सुरू झाले व त्यावेळेस आमच्या नफ्याच्या एक टक्का रक्कम आम्ही सामाजिक कार्यासाठी देण्यास सुरू केले. २००९मध्ये स्थापित झालेल्या पर्सिस्टंट फाउंडेशन बरोबरच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या आमच्या प्रयत्नांना एक अधिकृत स्वरूप प्राप्त झाले.’


‘फाउंडेशनतर्फे आरोग्य, शिक्षण आणि सामुदायिक विकास या क्षेत्रात यशस्वी व परिणामकारक प्रभाव पडावा या दृष्टीने कंपनीने आपल्या प्रयत्नांना व आपल्या कर्मचार्‍यांच्या योगदानाला दिशा दिली. गेल्या १० वर्षांत त्यांच्या प्रयत्नांना मिळालेल्या यशाचा आम्हाला अभिमान आहे.शाश्‍वत सामाजिक विकास व्हावा या दृष्टीने दीर्घकालीन ध्येयांवर हे फाउंडेशन लक्ष केंद्रित करत असून, त्यासाठी मी शुभेच्छा देतो.’

पर्सिस्टंट फाउंडेशनच्या अध्यक्ष सोनाली देशपांडे म्हणाल्या, ‘एकावेळी एक प्रकल्प व एक उपक्रम अशा पद्धतीने काम करून सामाजिक बदलासाठी अथक प्रयत्न करीत असताना आम्ही या प्रवासाची १० वर्षे पूर्ण केली असल्यामुळे पर्सिस्टंट फाउंडेशनच्या संपूर्ण टीमसाठी हा एक अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. सामाजिक विकास, सुधारित आरोग्य सेवा आणि दर्जेदार शैक्षणिक सुधारणा या विविध क्षेत्रांमध्ये अर्थपूर्ण सामाजिक क्रांती घडवून आणण्यासाठी सुरु असलेल्या आमच्या प्रयत्नांना आलेले यश पाहून आम्हांला अतिशय समाधान वाटत आहे.’

या सर्व प्रवासामध्ये शासकीय स्तरावरून, विविध शैक्षणिक संस्थांकडून, स्वयंसेवी संघटनांकडून आणि पर्सिस्टंट सिस्टीमच्या सर्व कर्मचार्‍यांकडून फाउंडेशनच्या कार्यासाठी मिळालेल्या बहुमोल अशा पाठिंब्याबद्दल आणि सहकार्याबद्दल आम्ही या सर्वाचे आभारी आहोत. याच सर्व प्रयत्नांचा आमचा अर्थपूर्ण आणि विलक्षण असा प्रवास यंदाच्या वर्षीच नव्हे, तर येत्या आगामी काळातही असाच कायम राखण्यासाठी प्रयत्नशील राहू; तसेच अत्यंत परिणामकारक आणि दीर्घकाळ कायम राहणारे सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search