Next
सुबोध भावे म्हणतोय ‘दुनिया गोल है’
BOI
Thursday, September 06 | 05:19 PM
15 0 0
Share this story


पुणे : ‘तुला पाहते रे’ या झी मराठी वाहिनीवरील मराठी मालिकेची  सध्या बरीच चर्चा आहे. यातील इशा म्हणजेच गायत्री दातार आणि विक्रम सरंजामे म्हणजे सुबोध भावे यांचा एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. स्वतः सुबोध भावे यानेही आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत सुबोधच्या हस्ते एका लहान मुलीला बक्षीस मिळाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून, गायत्री दातार आहे. 

गायत्री लहान असताना तिला एका स्पर्धेत सुबोध भावेच्या हस्ते बक्षीस देण्यात आले होते. त्या वेळी तिने म्हटले होते की, मला तुमच्या सोबत काम करायचे आहे. इशानेच 'तुला पाहते रे'च्या सेटवर सुबोधला ही आठवण सांगितली. त्या वेळचे आणि आताचा मालिकेतील फोटो सुबोधने शेअर केला आहे. दुनिया गोल है, हेच खरं!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link