Next
‘आयएमए’तर्फे सत्यशोधक समितीची स्थापना
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा अभ्यास करणार
BOI
Monday, June 03, 2019 | 03:38 PM
15 0 0
Share this article:

पुणे :   इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) या डॉक्टरांच्या राष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेने सत्यशोधक मोहीम समितीची स्थापना केली आहे. ही समिती, मुंबईतील नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टर पायल तडवी यांच्या दुर्दैवी आत्महत्येची पार्श्वभूमी व महत्त्वाचे घटक यांचे मूल्यमापन करणार आहे. या समितीमध्ये डॉ. अशोक आढाव,  डॉ. रवी वानखेडेकर, डॉ. चंद्रकांत म्हस्के, डॉ. होझी कपाडिया, डॉ. सुहास पिंगळे यांचा समावेश आहे.  

निवासी डॉक्टरांवर, प्रामुख्याने सरकारी रुग्णालयांमधील  निवासी डॉक्टरांवर कामाचा कमालीचा ताण असतो आणि त्यामुळे त्यांना नैराश्य येते, ही बाब सर्वांना माहीत आहे. संबंधित प्रकरणात, जातीय भेदभाव व कलंक हे आरोप करण्यात आले आहेत. हे खरे असेल तर हा फार गंभीर विषय आहे व त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. वैद्यकीय व्यवसायाने जात, धर्म व राजकारण या अडथळ्यांवर केव्हाच मात केली आहे. वैद्यकीय समुदायात किंवा रुग्णांमध्ये कोणत्याही बाबतीत भेदभाव केला जात नाही. परंतु, या अलिखित नियमामध्ये, वैयक्तिक हेवेदावे व वर्तन निर्माण होऊ शकते. आयएमए भेदभाव करणाऱ्या कोणत्याही वर्तनाकडे कानाडोळा करत नाही.

डॉक्टरांना ज्या हालाखीच्या स्थितीत काम करावे लागते ती स्थिती व विशेषतः सरकारी रुग्णालयांमधील राहण्याची व्यवस्था, त्यांच्याकडून नेहमीच लादला जाणारा कामाचा असाधारण ताण आणि क्लिनिकल कौशल्यांच्या अभावाबद्दल नेहमी केला जाणारा उपहास, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.

आयएमए सत्यशोधक समिती हा क्लिष्ट विषय बारकाईने अभ्यासणार असून, एका आठवड्यामध्ये आयएमए राष्ट्रीय अध्यक्षांकडे अहवाल सादर करेल.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search