Next
जॉनी लिव्हर मराठी शोमध्ये दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत
विनोदवीरांचा रिअॅलिटी शो
BOI
Wednesday, February 20, 2019 | 06:40 PM
15 0 0
Share this article:

जॉनी लिव्हरमुंबई : चित्रपट सृष्टीत दिवसेंदिवस अनेक बदल होत आहेत, त्याप्रमाणेच छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांमध्येही दिवसेंदिवस विविधता येताना दिसत आहे. यातून हिंदीतील अनेक कलाकार मराठीत येण्याचेही प्रमाण अलीकडे वाढताना दिसत आहे. अशाच एका मराठी ‘टीव्ही शो’मध्ये विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर परीक्षक म्हणून दिसणार आहेत.

आजकाल मराठी वाहिन्यांवरही ‘रिअॅलिटी शो’ज ची चलती दिसते. नृत्य, गायन यांवर आधारित टीव्ही कार्यक्रमांप्रमाणेच इतर अनेक विषयांवरचे रिअॅलिटी शो होताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील विनोदवीरांचा शोध घेण्यासाठी ‘स्टार प्रवाह’ या मराठी वाहिनीवर ‘एक टप्पा आउट’ हा विनोदी रिअॅलिटी शो सुरू होत आहे. या शोमध्ये कॉमेडी किंग जॉनी लिव्हर हे परीक्षकाच्या भूमिकेत असणार आहेत. त्यांच्यासोबत इतर दोन दिग्गज विनोदवीरही यात असतील. 

येत्या तीन मार्चपासून ‘एक टप्पा आउट’ या कार्यक्रमाच्या ऑडिशनला सुरुवात होणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक आणि रत्नागिरी या ठिकाणी या कार्यक्रमासाठीच्या ऑडिशन्स होणार आहेत. त्यातून विनोदवीर निवडले जाऊन त्यांच्यात ही स्पर्धा रंगणार आहे. 

दरम्यान मराठी रिअॅलिटी शोसाठी काम करताना काय भावना आहेत, असा प्रश्न जॉनी लिव्हर यांना विचारला असता, ‘विनोदाच्या क्षेत्रात स्टार प्रवाह वाहिनीने ‘एक टप्पा आउट’सारखे व्यासपीठ मला उपलब्ध करून दिले आहे याचा आनंद वाटतो. मराठी कार्यक्रमाचा भाग होता येणे ही माझ्यासाठी एक महाराष्ट्रीय म्हणून गौरवाची बाब आहे,’ असे ते म्हणाले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search