Next
सुरेखा जाधवर यांना आदर्श माता पुरस्कार प्रदान
BOI
Friday, July 19, 2019 | 06:15 PM
15 0 0
Share this article:

पुणे : श्रीसद्गुरु साधूबाबा सावळाराम क्षीरसागर समाधी मंदिराच्या वतीने देण्यात येणारा आदर्श माता पुरस्कार जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या खजिनदार सुरेखा जाधवर यांना प्रदान करण्यात आला. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र भिवडी येथील ब्रम्ह सांप्रदाय संस्थेत हा कार्यक्रम झाला. सुरेखा जाधवर या कै. उद्धवराव तुळशीराम जाधवर फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील गरजू लोकांकरिता अनेक उपक्रम राबवतात. संस्थेतील बालवाडी ते नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थीनींसाठी तसेच पालक वर्गासाठीदेखील त्या सातत्याने नवनवीन उपक्रम घेत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search