Next
भाजपतर्फे अॅड. अमित महेता यांना उमेदवारी
प्रेस रिलीज
Thursday, June 07, 2018 | 04:08 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भाजपने मुंबई पदवीधर मतदारसंघातून तरुण आणि उच्च शिक्षित विद्यार्थी चळवळीतून आलेल्‍या आपल्‍या कार्यकर्त्‍याला तसेच मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांचे हक्‍क, ग्राहक संरक्षण आणि भाडेकरून हक्‍कासाठी न्‍यायालयीन संघर्ष करणारा कार्यकर्ता म्‍हणून सुपरिचीत असणाऱ्या अॅड. अमित महेता यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्‍यक्ष रावसाहेब पाटील-दानवे यांच्‍या आदेशाप्रमाणे मुंबई भाजप अध्‍यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी अॅड. महेता यांची उमेदवारी सात जूनला जाहीर केली. कोकण भवन येथे दुपारी एक वाजता त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला.

अॅड. महेता हे जन्‍माने मुंबईकर असून, ते गोरेगाव येथे वास्‍तव्‍यास आहेत. विद्यार्थी चळवळीपासून ते सक्रिय काम करीत असून, आता मुंबई भाजपचे उपाध्यक्ष व ग्राहक संरक्षण सेलचे प्रमुख म्‍हणूनही कार्यरत आहेत. भाजपचा तरुण उच्चशिक्षित सक्रिय कार्यकर्ता अशी त्‍यांचे ओळख आहे. अॅड. महेता यांचे शिक्षण इंजिनीअरिंग, एमबीए आणि कायद्याची पदवी (एलएलबी) असे असून ते लॉ फर्मचे मॅनेजिंग पार्टनर आहेत. या फर्म मध्‍ये १५० वकिल काम करतात.

अॅड. महेता यांची फर्म ही ग्राहक संरक्षण, गृहनिर्माण सोसायटयांचे हक्‍क, भाडेकरू संरक्षण व त्‍यांचे हक्‍क, धार्मिक स्‍थळांचे संरक्षण या विषयात काम करते. आजपर्यत शेकडो मुंबईकरांना न्‍याय मिळवून देण्‍यात त्‍यांना यश आले. महा रेरा या कायद्याची जनजागृती व्‍हावी व ग्राहकांचे हक्‍क संरक्षीत व्‍हावे म्‍हणून त्‍यांनी गेल्‍या वर्षभरात ५० हून अधिक ग्राहक व गृहनिर्माण सोसायटयांचे मेळावेही घेतले.

घर घेणाऱ्या काही मुंबईकरांची बिल्‍डरकडून फसवणूक झाली होती त्‍या विरोधात कायदेशीर लढा लढून या मुंबईकरांना न्‍याय मिळवून देण्‍यात त्‍यांना यश आले. रेराचा मसूदा तयार होत असतनाही त्‍यांनी त्‍या कमिटीमध्‍ये काम केले  होते व त्‍यामध्‍ये ग्राहक संरक्षणासाठी आवश्‍यक असणाऱ्या तरतुदी असाव्‍यात म्‍हणून त्‍यांनी आग्रही भूमिका मांडली. त्‍यांनी केलेल्‍या ग्राहक संरक्षण क्षेत्रातील कामाबद्दल विविध पुरस्‍कारांनी ही त्‍यांना वेळोवेळी सन्‍मानित करण्‍यात आले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link