Next
पायाच्या अंगठारोपणाची देशातील पहिली शस्त्रक्रिया ‘सह्याद्री’मध्ये
पारेख इंडो-युएस फुट अ‍ॅंड अँकल सर्जरी परिषदेत शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण
प्रेस रिलीज
Saturday, January 12, 2019 | 03:05 PM
15 0 0
Share this article:

पुणे : हडपसर यथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एका ५२ वर्षीय पुरुष रुग्णाच्या पायाच्या अंगठ्यावर भारतातील पहिली पायाच्या अंगठ्याची रोपण शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वीरित्या करण्यात आली. संधिवातामुळे त्यांच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला तीव्र वेदना होत होत्या आणि यामुळे त्यांच्या हालचालींवर परिणाम झाला होता; मात्र आता या शस्त्रक्रियेमुळे त्यांना पूर्णपणे हालचाल करणे शक्य होणार आहे.

‘सह्याद्री सुपर स्पेशालिटी’तील आर्थोपेडिक्स विभागाचे प्रमुख डॉ. संपत डुंबरे पाटील व आर्थोपेडिक फुट अ‍ॅंड अँकल स्पेशालिस्ट, अमेरिकेतील ड्युक विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ सर्जरीचे प्राध्यापक आणि पारेख फॅमिली फाउंडेशनचे सहसंस्थापक डॉ. सेलेन पारेख यांनी दहाव्या पारेख इंडो-युएस फुट अ‍ॅंड अँकल सर्जरी कॉन्फरन्समध्ये केलेली ही कार्टिवा सिथेंटिक कार्टिलेज इम्प्लांट शस्त्रक्रिया उपस्थित डॉक्टरांसाठी थेट प्रक्षेपित करण्यात आली. ही परिषद सुजलॉन एनर्जी वन अर्थ येथे पार पडली.

या संदर्भात माहिती देताना ‘सह्याद्री सुपर स्पेशालिटी’चे आर्थोपेडिक्स विभागाचे प्रमुख डॉ. डुंबरे पाटील म्हणाले, ‘कार्टिवा तंत्रज्ञान येण्याआधी संधिवातामुळे अंगठ्याला होणार्‍या वेदनांसाठी फ्युजन शस्त्रक्रिया केली जायची. या शस्त्रक्रियेमुळे वेदनांपासून आराम मिळत असला, तरी रुग्णाच्या हालचालींवर त्याचा परिणाम होत असे. कार्टिवामध्ये मात्र, रुग्ण पूर्वीसारख्या हालचाली कालांतराने करू शकतील. कार्टिवा इंप्लांटमध्ये कॉन्टॅक्ट लेन्सेससारख्या कृत्रिम साहित्याचा वापर केला जातो व ते एकमेकांवर बसविले जातात, ज्यामुळे त्याचा आकार एखाद्या रेझरच्या ब्लेडससारखा दिसतो. हे त्यानंतर दोन हाडांमध्ये बसविले जाते. याच्या आकारामुळे ते हाडांमध्ये संपूर्णपणे जात नाही आणि थोडे बाहेर राहिल्यामुळे दोन्ही हाडे एकमेकांना घासत नाहीत आणि वेदनाविरहित हालचाल शक्य होऊ शकते. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला दुसर्‍या दिवशी घरी पाठविण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर लवकर बरे होण्यामध्ये फिजिओथेरपीचा महत्त्वाचा वाटा असतो. पुढील चार आठवड्यांतच रूग्ण आपल्या दैनंदिन कामकाज सुरू करू शकेल.’

‘ही शस्त्रक्रिया पहिल्यांदा कॅनडामध्ये केली गेली होती व त्यानंतर दोन वर्षे अमेरिकेत केली जात आहे. भारतात अशा प्रकारची शस्त्रक्रिया पहिल्यांदाच झाली आहे. याबाबतचा खर्च हा सध्या विचाराचा भाग नाही कारण हे तंत्रज्ञान भारतात उपलब्ध नाही. या शस्त्रक्रियेमध्ये अमेरिकेतील कंपनीने देणगीस्वरूपात हे इंप्लांट दिले आहे. अमेरिकेत पायाच्या अंगठ्याचा संधिवात असलेल्या रुग्णांची उपचारासाठी येण्याची संख्या अधिक आहे, कारण तिथे पाय व घोट्याच्या विकारांबाबत असलेल्या उपचारांविषयी पुरेशी जागृती आहे. भारतात या उपचारांविषयी अजून जागृती होणे आवश्यक आहे,’ असे डॉ. डुंबरे पाटील यांनी सांगितले.

पारेख फॅमिली फाउंडेशनने ही शस्त्रक्रिया संपूर्णपणे मोफत केली. शस्त्रक्रिया करणार्‍या डॉक्टरांच्या टीममध्ये डॉ. रॉब हॉलोवे, डॉ. बोनी चेन, डॉ. डॅनी स्कॉट आणि डॉ. मल्हार दवे यांचा समावेश होता.

या शिवाय या परिषदेत डॉ. डुंबरे पाटील व डॉ. सेलेन पारेख यांनी एका ७० वर्षीय रुग्णावर दुर्मिळ अशी पायाच्या घोट्याची रोपण शस्त्रक्रिया केली. या रुग्णाला काही दशकांपूर्वी फ्रॅक्चर झाले असल्यामुळे आयुष्याच्या पुढील टप्प्यात आर्थ्ररायटीसची जोखीम होती. त्यांच्या हालचालींवर परिणाम झाला होता व एका पायावर पूर्ण शरीराचे वजन पेलणे अवघड झाले होते. फिजिओथेरपीच्या साहाय्याने ते सहा आठवड्यांत पुन्हा चालू शकतील व पुढील १० आठवड्यांतच त्यांना शूज वापरता येतील.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search