Next
समाजोत्थान साहित्य व कला संमेलन १७ नोव्हेंबरपासून
अंध व अपंगाचे तिसरे दोन दिवसीय राज्यस्तरीय संमेलन
प्रेस रिलीज
Thursday, November 15, 2018 | 12:59 PM
15 0 0
Share this story

मकरंद अनासपुरेनागपूर : ‘अंध व अपंगाचे तिसरे दोन दिवसीय राज्यस्तरीय समाजोत्थान साहित्य व कला संमेलन १७ व १८ नोव्हेंबर २०१८ रोजी नागपूर येथे होणार असून, संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते केले जाणार आहे, या वेळी प्रमुख अतिथी म्हणून हास्य कवी एहसान कुरेशी उपस्थित राहतील. जेष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे संचलित ५० अंध व अपंग कलावंतांचा स्वरानंदवन हा सांस्कृतिक कार्यक्रम या संमेलनाचे विशेष आकर्षण असेल. या वेळी अंध व अपंगांच्या हिताचे १९ ठराव पारित करून ते शासनाला सादर केले जातील, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार प्रकाश गजभिये यांनी पत्रकार परिषदेत दिली.

समाजोत्थान अंध व अपंग सामाजिक कल्याणकारी संस्था आणि राष्ट्रीय विकलांग कल्याण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे अनोखे संमेलन आयोजित केले आहे. हे संमेलन १७ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता  नागपूरमधील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सुरू होईल. ज्येष्ठ साहित्यिक अनंत ढोले हे संमेलनाध्यक्ष असतील. विशेष अतिथी म्हणून देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, ‘राकापा’च्या अपंग सेलचे प्रदेशाध्यक्ष सुहास तेंडुलकर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुंबई अपंग हक्क विकास मंचाचे संयोजक विजय कान्हेकर उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार प्रकाश गजभिये आहेत. प्रमुख अतिथी म्हणून नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. भुषणकुमार उपाध्याय, महापौर नंदा जिचकार, शुअरटेक रुग्णालयाचे संचालक डॉ. राजू देशमुख, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, तर डॉ. उदय बोधनकर, गुणेश्वर आरीकर, शोएब असद यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या प्रसंगी प्रदीप देशमुख, सुनील दापोरेकर, प्रभा मेश्राम यांचा सत्कार केला जाणार आहे.
 
एहसान कुरेशीया दिवशी ‘अपंगांचे साहित्य आणि कालाभिरूची’ या विषयावर परिसंवाद होणार असून, याचे अध्यक्षस्थान प्रकाश पंडागळे भूषवतील. यात नामदेव बलगर, गिरधर भजभूजे, विलास भोतमांगे, कैलास रोडे हे सहभागी होतील. स्वरकथन व कथाकथन या चर्चासत्राचे अध्यक्षस्थान त्र्यंबकराव मोकासरे भूषवतील. डॉ. मंजुषा सावरकर, राजेश आसूदाणी, रणजित जोशी यांचा यात सहभाग असेल. दुपारच्या सत्रात कवयित्री राधा बोर्डे स्मृती कवीसंमेलन होणार असून, याच्या  अध्यक्षस्थानी काशिनाथ महाजन असतील. प्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत, डॉ. बळवंत भोयर हे सूत्रसंचालन करतील.

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १८ नोव्हेंबरला सकाळी १० ते ११ या वेळेत ‘अपंगांसाठी योजना व संधी’ याबाबत डॉ. शिरीष देशपांडे, संजय भक्ते, किशोर गोहिल, डॉ. संध्या पवार हे मार्गदर्शन करतील. ११ वाजता ‘अपंगांचे क्रीडा, साहित्य व सिनेक्षेत्रातील योगदान’ या विषयावर रणजीत जोशी यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. यात अजीज शेख, वर्मा तेलंग, घनश्याम आसुदानी, मणी पानसे, पल्लवी केवल जिवनतारे यांचा सहभाग असेल.

समारोपीय सत्रात विशेष अतिथी म्हणून जेष्ठ समाजसेवक आणि वरोरा (चंद्रपूर) येथील महारोगी सेवा समितीचे संचालक डॉ. विकास आमटे, आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, दैनिक सकाळचे संपादक शैलेंद्र पांडे, महाराष्ट्र टाइम्सचे श्रीपाद अपराजीत, हितवादचे शहर संपादक राहुल पांडे, लोकमतचे कार्यकारी संपादक गजानन जानभोर, नागपूर परिमंडळ तीनचे उपयुक्त राहुल माकनिकर, वसंत खळतकर, नागपूर दूरदर्शन केंद्राचे निर्माता रोशन सोमकुंवर, जिल्हा परिषदमधील अधिकारी सुकेशिनी तेलगोटे, अपंगांचे सामाजिक कार्यकर्ते वर्मा तेलंग उपस्थित राहणार आहेत.

या संमेलनाच्या माध्यमातून अंध व अपंग साहित्यिक व कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. त्यांच्या अभिव्यक्ति कौशल्य व कला आविष्कारातून त्यांचा जीवनसंघर्ष व उपलब्धी समाजापर्यंत पोहचविण्यात येतात. या संमेलनातून अंध व अपंग बांधवांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होते. या दोन दिवसीय संमेलनासाठी राज्यातून सुमारे ७०० अंध व अपंग सहभागी होणार आहेत.

संमेलनाविषयी :
दिवस :
१७ व १८ नोव्हेंबर २०१८  
वेळ : सकाळी ११.०० वाजता
स्थळ : डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हिल लाइन्स नागपूर.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link