Next
परांजपे स्कीम्सचा ‘ऑप्शन्स अनलिमिटेड’ गृह महोत्सव
प्रेस रिलीज
Friday, October 27 | 06:42 PM
15 0 0
Share this story

परांजपे स्कीम्स (कन्सट्रक्शन) लिमिटेडच्या ‘ऑप्शन्स अनलिमिटेड’ गृहमहोत्सवाबाबत   माहिती देताना श्रीकांत परांजपे व शशांक परांजपे
पुणे : ‘परांजपे स्कीम्स (कन्सट्रक्शन) लिमिटेड यांच्या वतीने येत्या तीन ते पाच नोव्हेंबर दरम्यान म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ लॉन्स येथे ‘ऑप्शन्स अनलिमिटेड’ या गृहमहोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे’ अशी माहिती ‘परांजपे स्कीम्स (कन्सट्रक्शन) लिमिटेडचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे यांनी दिली. 

परांजपे स्कीम्स (कन्सट्रक्शन) लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे म्हणाले, ‘परांजपे स्कीम्समध्ये उपलब्ध असलेले सर्व गृहपर्याय  ग्राहकांना एकाच छताखाली पाहता यावेत यासाठी तिसऱ्यांदा आम्ही ‘ऑप्शन्स अनलिमिटेड’ या गृहमहोत्सवाचे आयोजन करीत आहोत. या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे राज्यातील व देशातील तब्बल ८ ठिकाणी २८ गृहप्रकल्पांचे पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहेत. विशेष म्हणजे यांची किमत १२ लाख ते१२ कोटी या दरम्यान असेल. यामुळे समाजातील प्रत्येक आर्थिक गटाला आपल्या बजेटला साजेसे गृहपर्याय उपलब्ध असणार आहेत. याशिवाय हे संपूर्ण प्रदर्शन हे डिजीटलाईज्ड असणार असून या दरम्यान जागतिक विक्रमही (गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड) केला जाणार आहे हे विशेष. या महोत्सवात पुणे शहर आणि लगतच्या परिसरात असलेल्या डेक्कन, धायरी, वाकड, बाणेर, बावधन, ताथवडे, म्हाळूंगे, हिंजवडी, भूगाव, खेड – शिवापूर या भागातील गृहप्रकल्पांची नोंदणी ग्राहकांना करता येणार आहे. याबरोबरच या प्रदर्शनात राज्यातील मुंबई, नाशिक, कोल्हापूर, चिपळूण, रत्नागिरी या शहरांव्यतिरिक्त बेंगळूरू आणि वडोदरा येथे विकसित होत असलेल्या गृहप्रकल्पांचा देखील समावेश आहे. याशिवाय या गृहमहोत्सवात खास ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या ‘अथश्री’ प्रकल्पातील घरांचा समावेश असणार आहे’.     
‘ऑप्शन्स अनलिमिटेड’ मध्ये घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मिळणाऱ्या फायद्याविषयी बोलताना परांजपे पुढे म्हणाले, ‘ या महोत्सवात घरांच्या या अनेकविध पर्यायांबरोबरच ग्राहकांना अनेक सवलती देण्यात येणार आहे. ज्यामध्ये ५० लाखांपर्यंतच्या घरांचे अनेक पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध असतील. पझेशन मिळेपर्यंत कोणत्याही प्रकारचा ईएमआय ग्राहकांना भरावा लागणार नाही, लोएस्ट प्राईम गॅरंटी,  किंमतींवर जीएसटीचा नगण्य परिणाम यांबरोबरच केवळ २५ हजार रुपये भरून आपली सदनिका ग्राहकांना बुक करता येणार आहे. याशिवाय तब्बल ७५ हजार रुपयांपर्यंत स्क्रॅच अॅण्ड विन डिस्काउंट देखील ग्राहकांना मिळणार आहे. या सर्व सवलती प्रदर्शनानंतरही शुक्रवार, नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध होऊ शकतील. गृहमहोत्सवास प्रवेश विनामूल्य असून प्रदर्शनाची वेळ सकाळी ९ ते रात्री ९ अशी असेल'.
 
'गेल्या वर्षी खरेदीदारांनी दिलेला प्रतिसाद हा वाखाणण्याजोगा होता त्यामुळे याही वर्षी असाच उत्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळेल', असा विश्वासही  त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

 घरांच्या किंमती कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, त्याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘आज बांधकाम क्षेत्राचा विचार केला तर घरांच्या किंमती कमी होतील अशा अफवा कानावर पडत आहे, मात्र या क्षेत्राचा नीट अभ्यास केला तर सदनिकांच्या किंमती या कमी होणार नाहीत हे लक्षात येईल. कच्च्या मालाच्या वाढत्या किमती, रेरा आणि कायद्यांची अंमलबजावणी, पंतप्रधान आवास योजनेसारख्या योजनाचे लाभ मर्यादित कालावधीसाठी असल्याने पुढील वर्षात घरांच्या किमती वाढणार यात शंका नाही. त्यामुळे हाच काळ गृह खरेदीसाठी योग्य आहे’.

पंतप्रधान आवास योजना अत्यंत फायदेशीर योजना आहे मात्र अनेकांना त्याची माहितीच नाही, असे दिसते. त्यामुळे ‘ऑप्शन्स अनलिमिटेड’ या गृहमहोत्सवात या योजनेची माहिती देणारा एक खास स्टॉल ठेवण्यात  येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link