Next
‘लायन्स क्लब’कडून २८ टन निर्माल्य संकलन
प्रेस रिलीज
Monday, September 24, 2018 | 03:49 PM
15 0 0
Share this article:पुणे : लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या डीस्ट्रीक्ट ३२३४ डी दोनच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान तब्बल २८ टन निर्माल्य संकलन करण्यात आले.

पुणे व पिंपरी-चिंचवडमधील चाळीस लायन्स क्लबच्या एक हजाराहून अधिक सदस्यांनी सकाळी नऊ वाजल्यापासून २८ विसर्जन घाटावर उभे राहून गणेशभक्तांना निर्माल्य दान करण्याचे आवाहन करत हे निर्माल्य संकलन केले. लायन्स क्लबचे प्रांतपाल रमेश शाह यांच्या हस्ते धनकवडी येथे निर्माल्यदान उपक्रमाचे उद्घाटन झाले.

या प्रसंगी उपप्रांतपाल अभय शास्त्री, राजकुमार राठोड, मुकुंद खैरे, विक्रम शिंदे, पराग देशपांडे, आनंद आंबेकर, अॅड. बिपीन पाटोळे, राजेंद्र गोयल, डॉ. सतीश देसाई, संतोष पंडित, भरत जैन, प्रदीप पानघंटी, अंजना राठोड, मेघना शिंदे, परिणीता देशपांडे, वसंत वर्पे, किरण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमाद्वारे आपली नदी आणि जलस्त्रोत स्वच्छ राखण्यात आणि पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या कार्यात महापालिकेला मोलाची मदत झाल्याचे प्रांतपाल रमेश शाह म्हणाले. संकलित झालेले निर्माल्य खतनिर्मितीसाठी महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आले.

सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांचे लायन्स स्वयंसेवकांना सहकार्य लाभले. गेली १४ वर्षे ‘लायन्स’कडून हा उपक्रम राबविला जातो. विठ्ठलवाडी घाट, राजाराम पूल, दत्तवाडी घाट, एस. एम. जोशी पूल, पुलाची वाडी, लकडी पूल, विठ्ठल मंदिर घाट, ओंकारेश्वर घाट, संगम घाट, होळकर घाट, वडगाव कॅनॉल, पर्वती कॅनॉल, सारसबाग कॅनॉल, मार्केटयार्ड, धनकवडी, कात्रज रॅम्प, बिबवेवाडी, वारजे, औंध घाट, रहाटणी घाट, मोरया गोसावी घाट, गणेश तलाव आकुर्डी या ठिकाणी उपक्रम राबविला गेला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search