Next
‘किया’ची पहिली ‘मिड-एसयूव्‍ही’ या वर्षात होणार सादर
प्रेस रिलीज
Wednesday, April 24, 2019 | 03:55 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : किया मोटर्स या ऑटो उत्‍पादक कंपनीतर्फे २०१९मध्‍ये ‘मिड-एसयूव्‍ही’ सादर केली जाणार आहे. पुढील तीन वर्षांमध्‍ये कंपनीचा भारतातील अव्‍वल पाच ऑटो उत्‍पादक कंपन्‍यांच्‍या यादीत स्‍थान मिळवण्‍याचा मानस आहे. भारतातील या पहिल्‍या उत्‍पादनाच्‍या सादरीकरणानंतर दर सहा महिन्‍यांमध्‍ये एक नवीन कार सादर करण्‍याचे कंपनीचे लक्ष्‍य असून, २०२१पर्यंत कंपनी पोर्टफोलिओ किमान पाच व्हेइकल्‍सपर्यंत वाढवण्‍याची शक्यता आहे. 

‘किया मोटर्स’ने ‘ऑटो एक्‍स्‍पो २०१८’मध्‍ये भारतात पदार्पण केले आणि ‘एसपी कन्‍सेप्‍ट’सह त्‍यांच्‍या १६ अव्‍वल जागतिक लाइन-अपचे प्रदर्शन दाखवले. सादर करण्यात येणारी कार ही कंपनीच्‍या अनंतपूर येथील कारखान्‍यामध्‍ये तयार केली आहे आणि ही कार २०१९च्‍या उत्‍तरार्धात सादर केली जाईल. या कारमध्‍ये जागतिक दर्जाची क्‍वॉलिटी, सुरेख डिझाइन व अत्‍याधुनिक तंत्रज्ञान अशी सर्वोत्‍तम वैशिष्‍ट्ये असणार आहेत. ‘रॉयल बंगाल टायगर’कडून प्रेरणा घेत कारमध्‍ये ‘किया’चे वैशिष्‍ट्य असलेले ‘टायगर नोज ग्रील’ आहे. ही कार चीफ डिझाइन ऑफिसर पीटर श्रेयर यांनी डिझाइन केली असून, ती पूर्णत: ‘मेक इन इंडिया’शी संलग्‍न आहे. 

२९ जानेवारी २०१९ रोजी किया मोटर्स इंडियाने आंध्रप्रदेशचे माननीय मुख्‍यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्‍या उपस्थितीत आगामी ‘मिड-एसयूव्‍ही’च्‍या ट्रायल उत्‍पादनाला सुरुवात केली. या समारोहाला ‘किया मोटर्स कॉर्पोरेशन’चे अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी हॅन-वू पर्क, ‘किया मोटर्स इंडिया’चे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी कूकयून शिम हेदेखील उपस्थित होते. या समारोहादरम्‍यान ‘किया’ने भारतासाठी ‘मिड-एसयूव्‍ही’चे गोपनीय उत्‍पादन व्‍हर्जनदेखील दाखवले. नायडू यांनी या कारची टेस्‍ट ड्राइव्‍ह घेतली. 

अनंतपूरमधील ५३६ एकर जागेवर पसरलेल्या कारखान्यात ‘मिड-एसयूव्‍ही’चे उत्‍पादन होईल. या कारखान्‍यामध्‍ये दर वर्षाला तीस लाखांहून अधिक व्हेइकल्‍स निर्माण करण्‍याची क्षमता आहे. तसेच हा कारखाना प्रांतामध्‍ये तीन हजार प्रत्‍यक्ष व सात हजार अप्रत्‍यक्ष रोजगारांची निर्मिती करेल. अनंतपूर येथील एकीकृत ऑटोमोटिव्‍ह उत्‍पादन सुविधा असलेल्‍या नवीन कारखान्‍यामध्‍ये आधुनिक उत्‍पादन तंत्रज्ञानांसह प्रेस, बॉडी व पेंट शॉप्‍सचे ऑटोमॅटिक काम करणारे ३०० हून अधिक रोबो आहेत. 

या कारखान्‍यामध्‍ये हायब्रिड व इलेक्‍ट्रिक व्हेइकल्स निर्माण करण्‍याची क्षमता आहे. या कारखान्‍यामध्‍ये रोबोटिक्‍स व आर्टिफिशियल इंटेलिजन्‍ससारखे अधिक प्रगत जागतिक तंत्रज्ञान आहे. हा कारखाना पर्यावरणास अनुकूल असून, कारखान्‍यामध्‍येच १०० टक्‍के पाण्‍याचे पुनर्चक्रण केले जाते. याव्‍यतिरिक्‍त, या कारखान्‍यामध्‍ये पाच-एकर जागेवर प्रशिक्षण केंद्र आहे. हे केंद्रामार्फत कारखान्‍यामधील फॅक्‍टरी फ्लोअरवरील इंट्री-लेव्‍हल रोजगारासाठी आवश्‍यक सर्व कौशल्‍य विकासासाठी ऑटो मोबाइल्‍समधील बेसिक टेक्निकल कोर्सची (बीटीसी) सुविधा दिली जाते. भारतीय बाजारपेठेतील प्रवेश कोरिया, स्लोव्हाकिया, चीन, यूएसए व मेक्सिकोमधील कंपनीच्‍या इतर कारखान्‍यांशी पूरक अशी महत्त्वाची भूमिका बजावेल.

भारतीय बाजारपेठेतील प्रवेशापासून ‘किया मोटर्स’ने भारतात व ग्राहक संबंधांमध्‍ये प्रबळ विक्रीपश्‍चात व नेटवर्क उपस्थिती विकसित करण्‍यावर लक्ष केंद्रित केले आहे. ‘किया’ व्हेइकल्सचे मालक बनण्‍याची प्रक्रिया सुलभ करण्‍यासाठी या ऑटोउत्‍पादक कंपनीने भारतातील आठ आघाडीच्‍या बँकांसोबत सामंजस्‍य करार केला आहे. या करारांतर्गत ग्राहकांना आर्थिक सुविधा मिळण्‍यासह आकर्षक ऑफर्सचा लाभ घेता येईल.

‘किया मोटर्स’ने नुकताच रोड-शोचा दुसरा टप्‍पा पूर्ण केला असून, या टप्‍प्‍यांतर्गत दोन महिन्‍यांत २६ शहरांमध्‍ये १५ हजार किमी अंतरापर्यंत प्रवास करण्‍यात आला. या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून किया मोटर्स इंडिया देशभरातील १० हजारांहून अधिक संभाव्‍य ग्राहक व खरेदीदारांपर्यंत पोहोचली. जागतिक स्‍तरावर ‘किया मोटर्स कॉर्पोरेशन’ने २००८पासून विक्रीमध्‍ये दुप्‍पट वाढ केली आहे. कंपनीने गेल्‍या वर्षी २.८ दशलक्ष कार्सच्‍या विक्रीची नोंद केली; तसेच किया मोटर्स कॉर्पोरेशनचा २०२५पर्यंत जागतिक स्‍तरावर १६ इलेक्‍ट्रिक व्हेइकल्‍स सादर करण्‍यासह भावी पिढीसाठी हरित व स्‍वच्‍छ पर्यावरण करण्‍याचा मानस आहे. भावी इको गतिशीलतेसाठी भागीदारीसाठी सहयोग करण्‍यासाठी कंपनीने नुकतीच आंध्रप्रदेश राज्‍य सरकाकर सोबत सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्षरी केली. या करारांतर्गत कंपनीने आंध्रप्रदेश सरकारला हायब्रिड, प्‍लग-इन  हायब्रिड आणि ईव्‍ही या थ्री नायट्रो कार्स दिल्‍या.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search