Next
‘एफसीए’चा अनोखा ‘जीप ४x४ मंथ’
प्रेस रिलीज
Friday, April 06, 2018 | 04:23 PM
15 0 0
Share this story

मुंबई : फियाट क्रिस्लर ऑटोमोबाइल्सने (एफसीए) भारतातील जीप ब्रँडसाठी ग्राहकांसोबतचा अनोखा सेलिब्रेशन ‘जीप ४x४ मंथ’ची घोषणा केली आहे. कंपनी दरवर्षी वर्षातील चौथ्या महिन्यामध्ये म्हणजेच एप्रिल महिन्याच्या चार तारखेला जागतिक पातळीवरील जीप ग्राहकांसोबत साजरा करणारा ‘इंटरनॅशनल जीप ४x४ डे’चा भाग म्हणून ‘जीप ४x४ मंथ’ची सुरुवात झाली आहे. ‘जीप ४x४ मंथ’ भारतात ४ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत सुरू राहिल.

‘एफसीए’ इंडियाने तयार केलेल्या एका नाविन्यपूर्ण प्रोग्राममध्ये जीप ४x२ व्हेरिएंट बुक केलेल्या ग्राहकांना किंवा बुक करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना फक्त ५० हजार रुपये भरून लिमिटेड ‘४x४ व्हेरिएंट’ बुक करण्यासाठी नवीन ग्राहकांना प्रोत्साहित करते. हे लिमिटेड व्हेरिएंट ख्यातनाम ‘जीप ४x४’ क्षमतेच्या आंतरराष्ट्रीय सेलिब्रेशनचा भाग म्हणून संपूर्ण भारतात चार ते ३० एप्रिल २०१८ दरम्यान उपलब्ध असेल.

‘एफसीए’ इंडिया या महिन्यामध्ये मुंबई, पुणे व हैद्राबादमधील संभाव्य ग्राहक व हौशींसाठी कँप जीप, ४x४ ड्रायव्हिंग राबवण्यासोबतच जीप ब्रँडचा अनुभव देईल.

या बोलताना ‘एफसीए’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक केविन फ्लिन म्हणाले, ‘जीप ४x४ मंथ ही ग्राहकांना त्यांची जीप कंपास बुक करण्यासाठी आणि आमच्या ब्रँडचे मूलतत्त्व असलेल्या दिग्गज क्षमता, स्वातंत्र्य व साहसाचा आनंद घेण्याची एक खास व अनोखी संधी आहे. आम्ही बाजारपेठेमधील दाखलीकरणापासून जवळपास २० हजार जीप कंपास एसयूव्हींची विक्री केली आहे आणि आमच्या उत्पादनांना नवे स्वरूप देताना जीप कंपास मालकांचा अभिमान व आनंद अनुभवताना खूपच चांगले वाटत आहे. प्रत्येक संधी साधत त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यामध्ये त्यांना मदत करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.’

‘एफसीए’ने ‘जीप ४x४ मंथ’ची जाहिरात करण्यासाठी आणि देशभरातील लोकांना त्याबद्दलची माहिती मिळावी यासाठी प्रिंट, डिजिटल, ओओएच व टीव्ही यांचा समावेश असलेल्या अत्यंत प्रभावी व व्यापक कम्युनिकेशन्स कँपेनची योजना आखली आहे. सोबतच लोकांना या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याची देखील योजना आखली आहे.

फ्लिन पुढे म्हणाले, ‘आमचे डीलर भागीदार ‘जीप ४x४ मंथ’ला पुढील स्तरावर घेऊन जाण्यासाठी आमच्या विद्यमान कंपास मालकांसह जीपचा सहभाग वाढण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. त्यांनी या वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. जवळपास सहा हजारांहून अधिक कंपास एसयूव्ही नवीन जीप ग्राहकांना डिलिव्हर करण्यात आल्या आहेत.’

३१ जुलै २०१७ रोजी भारतात जीप कंपास सादर करण्यात आली आणि एक जून २०१७ रोजी रांजणगावमधील कारखान्यातून पहिली गाडी बाहेर पडली. एसयूव्ही स्पोर्ट, लॉन्गिट्यूड व लिमिटेड या तीन प्रिमिअम ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे आणि १० व्हेरिएंट्ससह दोन लिटर टर्बो डिझेल व १.४ लिटर टर्बो पेट्रोल मल्टीएअर पॉवरस्ट्रेन पर्यायांसोबतच ४x४ व ४x२ व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे.

फियाट क्रिस्लर ऑटोमोबाइल्स बाबत :

फियाट क्रिस्लर ऑटोमोबाइल्स (एफसीए) अबार्थ, अल्फा रोमिओ, क्रिस्लर, डॉज, फियाट, फियाट प्रोफेशनल, जीप, लॅन्सिया, राम, एसआरटी ब्रॅण्ड्स अंतर्गत वाहने, तसेच मेसेरटी ब्रॅण्ड्स अंतर्गत आरामदायी कार्सचे डिझाइन, रचना, निर्माण व वितरण करते.

‘एफसीए’ मॅग्नेटी, मरेली व टेकसिडच्या माध्यमातून कॉम्पोनंट विभागामध्ये आणि कॉमेच्या माध्यमातून उत्पादन यंत्रणा विभागामध्ये आणि मोपार ब्रँड नावांतर्गत विकी-पश्चात्त सेवा व उत्पादने विभागामध्ये कार्यरत आहे. याव्यतिरिक्त, ग्रुप रिटेल व डिलर फायनान्स, लीजिंग व रेंटल सेवा देतो आणि उपकंपन्या, संयुक्त उद्यम व विशेष आर्थिक सेवा प्रदात्यांसोबतच्या व्यावसायिक करारांच्या माध्यमातून कार व्यावसायिकांना पाठिंबा देतो.

‘एफसीए’ हा आंतरराष्ट्रीय ऑटो समूह आहे, ऑटोमोटिव्ह विभागामधील औद्योगिक कृतींमध्ये सामील आहे. ‘एफसीए’ कंपनी ४० देशांमध्ये उपस्थित असण्यासोबतच सुमारे १५० देशांमधील ग्राहकांसोबत त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत.

जीप ब्रँडबाबत :
७५ वर्षांहून अधिक काळाच्या दिग्गल वारसासह निर्माण करण्यात आलेली, जीप ही अद्भुत प्रवासाचा आनंद घेण्याची इच्छा असलेल्या लोकांसाठी दर्जेदार क्षमता, रचना व विविध आकर्षक वैशिष्ट्यांनी युक्त असलेली अस्सल एसयूव्ही आहे.

जीप मालकांना कोणताही प्रवास आत्मविश्वासाने पूर्ण करण्याची सुरक्षितता देणाघी परिपूर्ण वाहने देत जीवनाचा परिपूर्ण आनंद घेण्याची सुविधा देतो. भारतातील जीप वाहनाच्या लाइन-अपमध्ये जीप रँगलर, ग्रँड शेरोकी आणि आता जीप कंपास यांचा समावेश आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link