Next
‘आयसीआयसीआय’ची तिमाही व वर्षातील कामगिरी
प्रेस रिलीज
Monday, April 30 | 05:28 PM
15 0 0
Share this story

मुंबई : आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स या कंपनीचे ग्रॉस डायरेक्ट प्रीमिअम इन्कम (जीडीपीआय) आर्थिक वर्ष २०१८मध्ये १२३.५७ अब्ज रुपयांपर्यंत वाढले. आर्थिक वर्ष २०१७ च्या तुलनेत त्यात १५.२ टक्के वाढ झाली. सेवा देण्यात आलेल्या विमा योजनांची संख्या ३२.५ टक्के, २०१७मधील १७.७३ दशलक्षवरून आर्थिक वर्ष २०१८ मध्ये २३.५ दशलक्षपर्यंत वाढली.  

२०१८ मधील चौथ्या तिमाहीत कंपनीचे ग्रॉस डायरेक्ट प्रीमिअम इन्कम (जीडीपीआय) २९.२६ अब्ज रुपयांपर्यंत वाढले. २०१७मधील २६.६६ अब्ज रुपयांवरून ९.८ टक्के वाढ झाली. पीक विमा वगळता, आर्थिक वर्ष २०१८मधील चौथ्या तिमाहीत ‘जीडीपीआय’मध्ये १५.१ टक्के वाढ झाली. सेवा देण्यात आलेल्या विमा योजनांची संख्या २०.७ टक्के म्हणजे २०१७मधील चौथ्या तिमाहीतील ४.९० दशलक्षवरून २०१८मधील चौथ्या तिमाहीमध्ये ५.९१ दशलक्षपर्यंत वाढली.

२०१८मध्ये कम्बाइन्ड रेश्यो १००.२ टक्क्यांपर्यंत सुधारला, तर २०१७मध्ये १०३.९ टक्के होता, कारण पीक नुकसानाचा विपरित परिणाम होऊनही, लॉस रेश्योमध्ये २०१७मधील ८०.४ टक्क्यांवरून २०१८मध्ये ७६.९ टक्क्यांपर्यंत घट झाली.   २०१८मधील चौथ्या तिमाहीमध्ये कम्बाइन्ड रेश्यो ९९.५ टक्के होता, तर २०१७मधील चौथ्या तिमाहीमध्ये ९७.१ टक्के होता. पीक नुकसानाच्या विपरित अनुभवामुळे, लॉस रेश्यो २०१८मधील चौथ्या तिमाहीमध्ये ७८.५ टक्के होता.

२०१८मध्ये करपूर्व नफा ३१.४ टक्के वाढून ११.९६ अब्ज रुपये झाला, तर २०१७मध्ये ९.१०अब्ज रुपये होता. २०१८मध्ये करोत्तर नफा २२.८ टक्के वाढून ८.६२ अब्ज रुपये झाला. २०१७मध्ये ७.02 अब्ज रुपये होता. आर्थिक २०१७मधील करोत्तर नफ्यामध्ये अगोदरच्या वर्षातील ०.४० अब्ज रुपये या अतिरिक्त कर तरतुदीच्या रिटन बॅकचा समावेश आहे. टॅक्स रिटन बॅक विचारात घेता, २०१८मध्ये करोत्तर नफा अंदाजे ३०.२ टक्के वाढेल.

आर्थिक वर्ष २०१८मधील चौथ्या तिमाहीमध्ये करपूर्व नफा १५.५ टक्के वाढून २.८७ अब्ज रुपये झाला. २०१७मधील चौथ्या तिमाहीमध्ये २.४९ अब्ज रुपये होता. २०१८मधील चौथ्या तिमाहीमध्ये करोत्तर नफा १७.९ टक्के वाढून २.१२ अब्ज रुपये झाला. २०१७मधील चौथ्या तिमाहीमध्ये १.८०अब्ज रुपये होता. रिटन ऑन अॅव्हरेजचे (आरओई) प्रमाण २०१८मध्ये २०.८ टक्के होते. २०१७मध्ये २०.3 टक्के होते. ३१ मार्च २०१८पर्यंत सॉल्व्हन्सी रेश्यो २.०५x होता. ३१ मार्च २०१७पर्यंत २.१०x होता आणि १.५०x या नियमनानुसार किमान आवश्यकतेपेक्षा अधिक होता.

२०१७मधील कम्बाइन्ड रेश्यो १०३.९ टक्क्यांवरून २०१८मध्ये १००.२ टक्क्यांपर्यंत सुधारला. २०१७मधील लॉस रेश्यो ८०.४ टक्क्यांवरून २०१८मध्ये ७६.९ टक्क्यांपर्यंत सुधारला. ३१ मार्च २०१८ पर्यंत, इनव्हेस्टमेंट अॅसेट १८१.९३ अब्ज रुपये होती. ३१ मार्च २०१७ पर्यंत १४९.५० अब्ज रुपये होती. ३१ मार्च २०१८पर्यंत, इनव्हेस्टमेंट लेव्हरेजचे (नेट ऑफ बॉरोइंग्स) प्रमाण ३.९०x होते. ३१ मार्च २०१७पर्यंत ३.८८x होते.

कंपनीने वर्षभरात प्रति शेअर १.५० रुपये हंगामी लाभांश दिला. संचालक मंडळाने २०१८साठी प्रति शेअर २५० रुपये अंतिम लाभांशाची शिफारस केली असून, हा निर्णय भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन आहे. २०१८साठी प्रस्तावित अंतिम लाभांशासह एकूण लाभांश प्रति शेअर चार रुपये आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link