Next
‘रोटरी क्लब’तर्फे पुण्यात ‘जलोत्सव २०१९’चे आयोजन
प्रेस रिलीज
Monday, February 25, 2019 | 05:29 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘रोटरी क्लब पुणे डिस्ट्रिक्ट ३१३१’तर्फे २७ फेब्रुवारी ते दोन मार्च या कालावधीत पुण्यात ‘जलोत्सव २०१९’चे आयोजन करण्यात आले आहे.

पाण्याविषयी, पाणी वापर, बचत व पुनर्वापर यां विषयी जागरूकता, जलसाक्षरता निर्माण करण्यासाठी हा जलोत्सव आयोजित करण्यात येत असून, या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जल क्षेत्रात असलेल्या कारकिर्दीच्या संधींवर मार्गदर्शन करण्यावर या वर्षी भर देण्यात येणार असल्याची माहिती ‘रोटरी क्लब’च्या वॉटर कमिटीचे अध्यक्ष सतीश खाडे यांनी दिली.  

२७ फेब्रुवारीला आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय येथे सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत ‘जलक्षेत्रातील कारकिर्दीच्या संधी’ या विषयावर परिसंवाद होईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, भूजल शास्त्रज्ञ उपेंद्र धोंडे, वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. सचिन पुणेकर त्यात सहभागी होतील. रोटरी क्लब कोथरूड, रोटरी क्लब अमनोरा यांनी संयोजन केले आहे.   

या जलोत्सवादरम्यान विविध शैक्षणिक संस्थांमध्ये व्याख्यानांचे आयोजन केले आहे. यात डॉ. अरविंद नातू, उमेश मुंडले, व्ही. एम. देसाई, ओ. मणीवान्ना, प्रदीप पुरंदरे, उपेंद्र धोंडे, कृष्णा लव्हेकर, डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. श्रीकांत गबाले, रवींद्र उलंघिवार, संजय इनामदार, प्रभात रंजन यांची व्याख्याने होणार आहेत. रोटरी वॉटर ऑलिम्पियाड स्पर्धेचा पारितोषिक वितरण दोन मार्चला होईल.

दरम्यान, रोटरी जलोत्सवाच्या वतीने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स रिसर्च (आयसर, पाषाण) येथे २३ फेब्रुवारीला संस्थेत प्रदीप लोखंडे, डॉ. अरविंद नातू, अशोक रूपनर यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांच्या ‘रोटरी वॉटर ऑलिम्पियाड’ ही प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी आयोजित केला होता. रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड, पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ यांनी संयोजन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search