Next
नागनिका
BOI
Monday, October 01, 2018 | 10:34 AM
15 0 0
Share this article:

‘आपण शांत आहोत, अहिंसेचे पूजक आहोत याचा अर्थ कुणीही काहीही घेऊ नये, यासाठी आपण शस्त्रसज्ज, अर्थसज्ज असायला हवे,’ असा आज २१ व्या शतकातही लागू होणारा विचार इ.स. पूर्वी २०० वर्षे महाराणी नागनिका हिने केला होता. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात सातवाहन कालखंडाची सुरुवात झाली. दुसरा सातवाहन सिरी सातकर्णीला आजारपणामुळे मृत्यूची चाहूल लागली होती. त्यापूर्वी त्याने कर्तृत्त्ववान पत्नी नागनिका हिच्या हाती राज्य सोपविले.

विश्वातील पहिली राज्यकर्ती म्हणून कारभार करताना तिने सातवाहन कुळाचे नाव सतत उंचावत नेले. प्रतिष्ठान (पैठण) ही त्यांची राजधानी. राज्याची अर्थव्यवस्था मजबूत करतानाच नागनिकेने नगरव्यवस्था, सीमासुरक्षा बळकट केली. आयात-निर्यात कर वसुली, प्रशासकीय व्यवस्थाही प्रभावीपणे राबविली. यज्ञ, दान, भूदान, सुवर्णदान, ग्रामदान अशा धार्मिक गोष्टींकडेही लक्ष दिले. बौद्ध, जैनांनाही सहकार्य केले. आपल्या काळाचे वर्णन करणारे शिलालेख तिने खोदून घेतले. तिच्या काळातील सातवाहनांचा सुवर्णकाळांचे वर्णन शुभांगी भडभडे यांनी ‘नागनिका’ या कादंबरीतून केले आहे.   

प्रकाशक : ऋचा प्रकाशन
पाने : ३९२
किंमत : ४६० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search