Next
‘गांधी स्मारक निधी’तर्फे ‘रोजा इफ्तार’चे आयोजन
प्रेस रिलीज
Saturday, May 18, 2019 | 05:13 PM
15 0 0
Share this article:

पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे (गांधीभवन) २० मे २०१९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता ‘रोजा इफ्तार’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी आणि सचिव अन्वर राजन यांनी दिली.

मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून,  उपवास सोडण्यासाठी ‘रोजा इफ्तार’चे आयोजन केले जाते. सर्वधर्मियांचे धार्मिक प्रसंग एकत्र साजरे करून सलोखा वाढविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे सर्वधर्मीय नागरिक आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा उपक्रम आयोजित केला जातो. हे या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. यासाठी पुणे, कोथरूड, वारजे परिसरातील मुस्लिम बांधव आणि मशिदीच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. गांधीभवन (कोथरूड) येथे हा कार्यक्रम होईल. 

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के .व्यंकटेशन, लिज्जत पापड संस्थेचे सुरेश कोते, पुणे महानगरपालिकेचे मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे उपस्थित राहणार आहेत. डॉ कुमार सप्तर्षी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील.    
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search