Next
‘घराला घरपण देणाऱ्या माणसा’ला हवाय जनाधार
BOI
Thursday, February 08 | 10:06 PM
15 0 0
Share this story

पत्रकार परिषदेत डी. एस. कुलकर्णी आणि मंदार जोगळेकरपुणे : ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांचा डीएसके उद्योगसमूह सध्या आर्थिक आव्हानांचा सामना करत आहे. ‘डीएसकें’च्या या कठीण काळात त्यांना मदत करण्यासाठी जगभरातून अनेक हात पुढे येऊ इच्छित आहेत. ही मदत गोळा करण्यासाठी डी. एस. कुलकर्णींनी गुरुवारी (आठ फेब्रुवारी) पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ‘क्राउड फंडिंग’ची घोषणा केली. ‘माझ्यासाठी दिला जाणारा हा ‘खारीचा वाटा’ नसून ‘सिंहाचा वाटा’ असेल,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच भविष्यात अन्य कोण्या चांगल्या माणसावर अशी वेळ आली, तर त्यासाठीही याद्वारे निधी गोळा करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.  

या वेळी डी. एस. कुलकर्णी म्हणाले, ‘सामान्य माणसापासून ते उद्योगपतीपर्यंत प्रत्येक जण मला आर्थिक मदत करण्यासाठी पुढे येत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. कोर्टात केस सुरू असूनही जनमानसामध्ये माझी प्रतिमा आजही चांगली आहे. ‘डीएसके हे आमचे प्रेरणास्थान आहेत’, ‘डीएसके कधी कुणाला फसविणार नाहीत’ अशी खात्री असणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच या वर्गासाठी मी ‘क्राउड फंडिंगच्या’माध्यमातून एक प्लॅटफॉर्म उभा करून देत आहे. या निमित्ताने ही संकल्पना पुन्हा आपल्याकडे रुजावी. चांगले काम करणारा माणूस अडचणीत आला तर त्याच्या मदतीसाठी समाज पुढे यावा या उद्देशानेच ‘क्राउड फंडिंग’ सुरू केले आहे. याद्वारे जमा होणाऱ्या पैशांमध्ये स्वतःची भर टाकून एक मोठा निधी तयार करण्याचा माझा मानस आहे. भविष्यात कोणत्याही चांगल्या माणसावर अशी वेळ आली, तर त्याच्यासाठी हा निधी वापरला जाईल. त्यामुळे जगभरातील लोकांनी ‘क्राउड फंडिंग’ संकल्पनेला उदंड प्रतिसाद द्यावा.’ 

‘डीएसके उद्योग हा एक प्रकारे क्राउड फंडिंगवरच सुरू आहे,’ असे डी. एस. कुलकर्णींनी या वेळी सांगितले. त्यांनी त्यांच्या बालपणाची उदाहरणे दिली. ‘मित्रांच्या चार-आठ आण्यांच्या मदतीमुळे मी भाजी विकू शकलो. कुणीतरी पाच-दहा रुपये दिले म्हणूनच मी पेपरची लाइन टाकू शकलो, फटाके विकू शकलो. असाच इतरांच्या मदतीमुळेच व्यवसाय पुढे गेला आणि त्यातूनच डीएसके उद्योगसमूह उभा राहिलेला आहे,’ असे ते म्हणाले. 

‘बुकगंगा’ही पाठीशी
दरम्यान, डी. एस. कुलकर्णी यांना पाठिंबा देण्यासाठी ‘बुकगंगा डॉट कॉम’चे संस्थापक मंदार जोगळेकर पुढे आले आहेत. त्यांनी ‘ग्लोबलसेतू’ हे व्यासपीठ तयार केले असून, त्या माध्यमातून ‘डीएसकें’साठी मदत उभी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

‘कितीही संकटे आली, तरी न डगमगता धीराने उभे राहणे खूप कठीण असते; झालेल्या चुका सुधारण्याची तयारी दाखविणे आणि त्या दृष्टीने अंमलबजावणी करणे हेही अवघडच असतं; मात्र तसे जे करू शकतात, ते त्या संकटांतून नक्की तरून जातात. कोणत्याही सामान्य व्यक्तीपासून अगदी मोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वांनाच हा नियम लागू होतो. ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी सध्या अशा परिस्थितीतून जात आहेत. मोठे संकट येऊनही त्यांनी त्यापासून पळ काढलेला नाही, की आपले तोंडही लपविलेले नाही. लोकांचे पैसे बुडविणार नाही, अशी ग्वाही ते वारंवार देत आहेत. लहानपणी वर्तमानपत्रे विकणाऱ्या एका मुलाने भविष्यात स्वतःच्या हिमतीवर मोठे साम्राज्य उभे केले आणि अनेक जणांचे घराचे स्वप्न पूर्ण केले. आज अडचणीच्या स्थितीत असतानाही त्यांच्याकडे ती हिंमत आणि जिद्द आहे. फक्त त्यांना लोकांच्या आधाराची आणि पाठिंब्याची गरज आहे,’ असे जोगळेकर म्हणाले. 

‘डी. एस. कुलकर्णी यांची कंपनी छोट्या छोट्या ठेवीदारांच्या ठेवींमधून म्हणजेच एक प्रकारे क्राउडफंडिंगमधून उभी राहिली आहे. आताच्या स्थितीतून त्यांना बाहेर यायला मदत करण्यासाठीही क्राउडफंडिंगचे तत्त्वच मदत करू शकते. त्यासाठी आम्ही ग्लोबल सेतू नावाचे व्यासपीठ उपलब्ध केले आहे. आपल्या माणसांचे नेटवर्क तयार करणे आणि त्या नेटवर्कचा फायदा सर्वांना करून देणे आणि अडीअडचणीत एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे सुलभ व्हावे, हा त्यामागचा उद्देश आहे. ग्लोबल सेतू नावाचे अॅप आणि वेबसाइट तयार करण्यात आली असून, त्यावर ‘ग्लोबल सेतू फाउंडेशन’ हा ग्रुप तयार करण्यात आला आहे. त्या माध्यमातून निधी उभारून, त्यातून व्यावसायिकांना मदत केली जाणार आहे. त्यात सहभागी होऊन कोणीही व्यक्ती ‘डीएसकें’ना मदत करू शकते. यातील नेटवर्कचा फायदा त्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकालाच होणार आहे,’ असे जोगळेकर यांनी सांगितले. (‘ग्लोबल सेतू’बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.)

‘सध्याच्या परिस्थितीतही डीएसके यांच्याकडे जी सकारात्मक ऊर्जा आहे, ती लक्षात घेतली पाहिजे. त्यांना पुन्हा एकदा उभे राहायला समाजाच्या पाठिंब्याची गरज आहे, त्यासाठी आवश्यक ती जिद्द त्यांच्याकडे आहेच. त्यांचे पुन्हा उभे राहणे समाजातील अनेक घटकांसाठी आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी त्यांना या कठीण परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी मदतीचा हात द्यावा,’ असे आवाहन जोगळेकर यांनी केले. 

युवकाने दिले १८ हजार रुपये
प्रतीक कोळपे या महाविद्यालयात शिकणाऱ्या युवकाने ‘डीएसकें’ना मदत म्हणून आपली १८ हजार रुपयांची पुंजी देऊ केली आहे. प्रतीकने दररोज गाड्या धुण्याचे काम करून रोज ५०, १०० रुपये कमावले. अशी गेल्या काही वर्षांत  त्याने साठवलेली १८ हजार रुपयांची पुंजी त्याने ‘डीएसकें’ना देऊ केली आहे. ‘डीएसकें’च्या सच्चाईवर, जिद्दीवर विश्वास असल्याने आपण स्वखुशीने त्यांना ही मदत देऊ केल्याचे त्याने सांगितले.

‘डीएसकें’ना अशी मदत देण्याची तयारी अनेकांनी दाखवली असून, आतापर्यंत असे नऊ लाख रुपयांचे धनादेश आल्याचे ‘डीएसकें’नी सांगितले. ‘लोकांनी घर, शेत विकून पैसे द्यायची तयारी दाखवली आहे. आतापर्यंत हे पैसे स्वीकारले नव्हते. डीएसके भीक मागत आहेत, अशी चर्चा सुरू झाली होती; पण आता लोकांनी ‘क्राउड फंडिंग’च्या माध्यमातून मदत स्वीकारणार आहे,’ त्यांनी स्पष्ट केले.

क्राउड फंडिंग म्हणजे काय?
‘क्राउड फंडिंग’ म्हणजे सर्वसामान्य नागरिकांनी एखाद्या विशिष्ट कार्याला आपणहून पैसे देणे. हा प्रकार सध्या अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात प्रचलित आहे. तथापि ही संकल्पना भारतासाठी नवी नाही. तळेगावचा पैसा फंड काच कारखाना हे ‘क्राउड फंडिंग’चे सर्वांत मोठे उदाहरण देता येईल. या कारखान्याद्वारे एक उद्योग सुरू करण्यासाठी सामान्य माणसांनी पुढे येऊन पैसे गोळा केले. 

‘डीएसकें’ना ‘क्राउड फंडिंग’द्वारे ऐच्छिक निधी देण्यासाठी तपशील :

चेक देण्यासाठी : 
पुण्यातील मुख्य कार्यालय
डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लि.
११८७/६०, जे. एम. रोड, 
शिवाजीनगर, पुणे - ४११००५

मुंबई कार्यालय :
डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लि.
डीएसके हाउस, पहिला आणि दुसरा मजला,
वीर सावरकर मार्ग (कॅडेल रोड), 
महापौर बंगल्याजवळ, शिवाजी पार्क, मुंबई – ४०००२८

ऑनलाइन ट्रान्स्फर करण्यासाठी :
Account Name : Deepak Sakharam Kulkarni 
Bank Name : Axis Bank, Pune Main 
Account Number : 916010080935369 
IFSC Code : UTIB0000037

भारताबाहेरून पैसे पाठवण्यासाठी : 
Bank Name : 1ST CONSTITUTION BANK
Bank Address : P. O. BOX 634, ROUTE 130, CRANBURY, NJ 08512 
Account Name : DSK DEVELOPERS CORPORATION
Account Number : 9760131329 
Routing Number : FW 021207154 
Swift Code : WFBIUS6S

(पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Amit About 310 Days ago
Why the savings account details have been shared? Don't they have the company's separate account for official affairs? Even the account name for overseas transfers doesn't exactly match with the company's name. Can any "DSK Fan" clarify on this?
0
0
Vijay Sabnis About 310 Days ago
I would like to send a check of Rs 10,000 ( ten thousand) in Mumbai. Let me know what I should do.
2
0
Ganesh Kalaskar About 311 Days ago
Mandarji good initiatives keep it up we are contributing.....
1
0

Select Language
Share Link