Next
सोलापूर जिल्ह्यात लावली जाणार २२ लाख झाडे
BOI
Wednesday, June 20 | 10:58 AM
15 0 0
Share this story

सोलापूर : तेरा कोटी वृक्ष लागवड मोहिमेत यंदा सोलापूर जिल्ह्यात २२ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने दिले आहे; मात्र जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यात २२ लाखांहून अधिक झाडे लावण्याचा निर्धार केला असून, जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना त्यांनी झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले आहे.

राज्य शासनाच्या वन विभागाकडून गेली दोन वर्षे वृक्ष लागवड करण्याचे अभियान सुरू आहे. पहिल्या वर्षी दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात जिल्ह्यात आठ लाखांहून अधिक झाडे लावण्यात आली होती. सन २०१७मध्ये झालेल्या अभियानात जिल्ह्यास पाच लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते आणि ते यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले होते.

या वर्षी २२ लाख रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त झाडे लावण्याचा निर्धार जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील विविध यंत्रणांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट डॉ. भोसले यांनी दिले आहे. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे दहा लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट वन विभागाला, तर त्यापाठोपाठ सामाजिक वनीकरण विभागास पाच लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link