Next
स्वातंत्र्याची ७१ वर्षे
BOI
Wednesday, August 15, 2018 | 08:00 AM
15 0 0
Share this article:

देशाच्या स्वातंत्र्याला आज, १५ ऑगस्ट २०१८ रोजी ७१ वर्षे पूर्ण होत आहेत. या कालावधीत देशाने खूप मोठी प्रगती केली आहे. देशाच्या विविध क्षेत्रांमधील या वाटचालीतील काही महत्त्वाच्या टप्प्यांवर टाकलेली ही नजर...
...............
१५ ऑगस्ट १९४७ : भारत स्वतंत्र झाला. रात्री १२ वाजता लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावून, राष्ट्रगीताचे गायन करून स्वातंत्र्याचे स्वागत करण्यात आले. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पं. जवाहरलाल नेहरू यांनी त्या वेळी केलेले भाषण ‘नियतीशी करार’ म्हणून प्रसिद्ध आहे. 

३० जानेवारी १९४८ : रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या.

१९४८ : वादग्रस्त काश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तानशी युद्ध.

२६ नोव्हेंबर १९४९ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली देशाचे संविधान तयार झाले. हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 

२६ जानेवारी १९५० : भारत प्रजासत्ताक देश म्हणून घोषित करण्यात आला. 

१५ डिसेंबर १९५० : सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन.

१९५२ : पहिली निवडणूक

१९५२ : पहिली निवडणूक

पंडित जवाहरलाल नेहरू१९५२ : नेहरूंच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र भारतातील पहिली निवडणूक पार पडली. जवळपास ६०% लोकांनी निवडणुकीमध्ये मतदान केले व काँग्रेसला निवडून दिले. 

१९५४ : चीन आणि भारतामधील संबंध शांततापूर्ण राहावेत, यासाठीची ‘पंचशील तत्त्वे’ नेहरूंनी मांडली व त्यावर चीन आणि भारताच्या प्रतिनिधींनी स्वाक्षरी करून त्याला मंजुरी दिली.

१९५६ : १४ ऑक्टोबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. सहा डिसेंबरला बाबासाहेबांचे निधन झाले. 

१९५६ : राज्य पुनर्रचनेचा कायदा आला व त्यात देशातील अनेक प्रादेशिक भागांचे भाषाधारित विभाजन होऊन अनेक प्रदेश राज्य म्हणून जोडले गेले. 

२३ जानेवारी १९५७ : व्ही. के. कृष्ण मेनन यांनी भारताची काश्मीरबद्दलची बाजू मांडणारं तब्बल आठ तासांचं ऐतिहासिक भाषण संयुक्त राष्ट्रसंघात केलं.

२६ जानेवारी १९५७ : काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्यावर घटनेद्वारे शिक्कामोर्तब.

११ सप्टेंबर १९५८ : लष्कराला विशेषाधिकार देणारा अॅफ्स्पा (दी आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर अॅक्ट) कायदा संसदेत मंजूर. या कायद्याला विरोध करण्यासाठी इरॉम शर्मिला यांनी १६ वर्षे उपोषण केलं.

१९५९ : भारतात दुचाकी आणि तिचाकींची निर्मिती करण्यासाठी ‘बजाज ऑटो’ला केंद्र सरकारकडून लायसन्स.

एक मे १९६० : संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती.

१७ आणि १८ डिसेंबर १९६१ : गोवा, दीव, दमण ही संस्थाने भारतात विलीन.

१९६२ : चीनशी युद्ध.

नऊ जून १९६४ : दुसरे पंतप्रधान म्हणून लालबहादूर शास्त्री यांचा शपथविधी. १९६५च्या युद्धात नेतृत्व. ‘जय जवान-जय किसान’चा नारा.

२७ मे १९६४ : जवाहरलाल नेहरूंचं निधन.

१९६५ : काश्मीरच्या संदर्भात पाकिस्तानशी दुसरं युद्ध

११ जानेवारी १९६६ : भारत-पाकिस्तानमध्ये शांततेचा ताश्कंद करार.

इंदिरा गांधी२४ जानेवारी १९६६ : इंदिरा गांधी पहिल्या महिला पंतप्रधान.

१९६६ : रिटा फारिया ठरली मिस वर्ल्ड बनणारी पहिली भारतीय आणि पहिली आशियाई महिला.

१३ मे १९६७ : भारताचे तिसरे राष्ट्रपती म्हणून झाकीर हुसेन यांचा शपथविधी. पहिले मुस्लिम राष्ट्रपती.

१९६७-१९६८ : नॅशनल क्रेडिट कौन्सिलची स्थापना.

१९ जुलै १९६९ : देशातील १४ प्रमुख बॅंकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय. संस्थानिकांचे तनखे रद्दबातल.

१६ डिसेंबर १९७१ : पाकिस्तानी सैन्याचा भारताकडून पराभव. बांगलादेशाचा जन्म.

१९७१-१९७२ : देशात मोठा दुष्काळ. अमेरिकेतून गहू मागविण्याची वेळ. मिलो गहू आयात झाल्याने जनतेत नाराजी.

१८ मे १९७४ : पोखरण येथे पहिली अणुचाचणी. ‘ आणि बुद्ध हसला’ हा सांकेतिक शब्द.

१९ एप्रिल १९७५ : ‘आर्यभट्ट’ हा भारताचा पहिला उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत दाखल.

१५ ऑगस्ट १९७५ : लोकप्रियतेचे उच्चांक गाठणारा ‘शोले’ चित्रपट प्रदर्शित.

१६ मे १९७५ : राजसत्तेला पायउतार करून सिक्कीम राज्य देशात दाखल.

२५ जून १९७५ : इंदिरा गांधींकडून आणीबाणी जाहीर. १० हजार जणांना अटक

२१ मार्च १९७७ : आणीबाणी संपली. इंदिरा गांधींच्या काँग्रेस पक्षाचा सार्वत्रिक निवडणुकीत पराभव.

मार्च १९७७ : देशातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी ‘दुर्गा’चा जन्म

आठ ऑक्टोबर १९७९ : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणीबाणीविरोधी लढ्याचे प्रेरणास्थान असलेले जयप्रकाश नारायण यांचे निधन.

१४ ऑक्टोबर १९७९ : मदर तेरेसा यांना शांततेचे नोबेल.
 
१४ जानेवारी १९८० : प्रचंड मताने इंदिरा गांधी पुन्हा एकदा पंतप्रधान. जनता पक्षाला अवघ्या ३१ जागा.

सहा एप्रिल १९८० : भारतीय जनता पक्षाची मुंबईत स्थापना.

१८ जुलै १९८० : भारताच्या ‘रोहिणी १’ उपग्रहाचे प्रक्षेपण. 

२६ जुलै १९८० : भारतीय हॉकी संघाला मॉस्को ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक.

दोन जुलै १९८१ : पुण्यात ‘इन्फोसिस’ची स्थापना.

१८ जानेवारी १९८२  :  मुंबईत गिरणी कामगारांचा संप सुरू. दत्ता सामंत यांच्या नैतृत्वाखाली ५० कापड गिरण्यांमधील अडीच लाख कामगार संपावर. 

१० एप्रिल १९८२ : ‘इस्रो’च्या ‘इन्सॅट १ ए’चे प्रक्षेपण.

१२ जुलै १९८२ : राष्ट्रपतिपदी ग्यानी झैलसिंग.

दोन ऑक्टोबर १९८२ : माजी अर्थमंत्री आणि रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर चिंतामणराव देशमुख यांचे निधन. 

१५ नोव्हेंबर १९८२ : विनोबा भावे यांचे निधन.

१९ नोव्हेंबर १९८२ : एशियाड स्पर्धांना प्रारंभ. भारतात रंगीत टीव्हीचे भारतात आगमन.

२५ जून १९८३ : भारतीय क्रिकेट संघाने जिंकला पहिला विश्वचषक. 

तीन जून १९८४ : पंजाबमधील सुवर्णमंदिरात लपलेल्या दहशतवाद्यांविरुद्ध भारतीय लष्कराची ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ मोहीम. 

३० ऑक्टोबर १९८४ : इंदिरा गांधी यांची हत्या. राजीव गांधी पंतप्रधानपदी नियुक्त. 

एक नोव्हेंबर १९८४ : दिल्लीत शीखविरोधी दंगल. हजारो शिखांची हत्या. 

दोन डिसेंबर १९८४ : भोपाळ विषारी वायू दुर्घटना. 

१५ ऑगस्ट १९८५ : आसाम चळवळीतील नेते आणि केंद्र सरकार यांच्यात ऐतिहासिक आसाम करार. 

२४ मार्च १९८६ : बोफोर्स तोफा खरेदी करार.

३० जून १९८६ : अयोध्येतील बाबरी मशिदीचे कुलूप काढून पूजेसाठी हिंदूंना प्रवेश देण्याचा न्यायालयाचा आदेश. 

२० फेब्रुवारी १९८७: अरुणाचल प्रदेशला राज्याचा दर्जा. यावर चीनचा आक्षेप. तवांग जिल्हा सीमेवर भारत-चीन सैन्यात संघर्ष. 

३० मे १९८७ :  देशाचे २५वे राज्य म्हणून गोव्याला संपूर्ण राज्याचा दर्जा. 

२९ जुलै १९८७ : श्रीलंकेत शांतिसेना पाठवण्यासंदर्भात भारत-श्रीलंका यांच्यात करार. 

१९८७ : ‘मॅग्नेटिक इंक कॅरॅक्टर रेकग्निशन’चे (MICR) चेक्स वापरून क्लिअरिंगला सुरुवात. सुनील गावसकरने कसोटीमध्ये १० हजार धावांचा टप्पा पार केला. 

१९८८ : मतदानाचं वय प्रथमच १८ वर आणलं; ‘सेबी’चा कारभार सुरू.

१९८९ : चेक बाउन्स झाल्यास दंड करण्याचा कायदा आणि अंमलबजावणी सुरू.; सचिन तेंडुलकरचे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण. 

१९९० : व्ही. पी. सिंग यांच्याकडून मंडल आयोगाची स्थापना.

१९९१ : राजीव गांधींची हत्या; पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान. नवी आर्थिक धोरणं स्वीकारली.

१९९२ : बाबरी मशीद पाडली आणि हिंदू-मुस्लिम दंगे.

१९९३ : दाऊदकडून मुंबईत बॉम्बस्फोट.

सुश्मिता सेन आणि ऐश्वर्या रॉय१९९४ : सुश्मिता सेन मिस युनिव्हर्स आणि ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड.

१९९५ : भारत ‘डब्ल्यूटीओ’चा सदस्य बनला. पुढे सुपरहिट झालेला ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ रिलीज झाला. ३१ जुलै १९९५ रोजी देशात मोबाइलची सेवा सुरू.

१४ ऑगस्ट १९९५ रोजी ‘व्हीएसएनएल’कडून पहिली सार्वजनिक इंटरनेट सेवा सुरू.

१९९६ : देशात प्रथमच भाजपची सत्ता. ती न टिकून देवेगौडा पंतप्रधान आणि कम्युनिस्ट सत्तेत. 

१९९७ : मदर तेरेसांचं निधन; पंतप्रधान गुजराल यांचा राजीनामा आणि मध्यावधी निवडणुका घोषित.

१९९७ : अरुंधती रॉय यांना ‘दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या पुस्तकासाठी बुकर पुरस्कार

१९९८ : अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील नोबेल. हा सन्मान मिळविणारे ते सहावे भारतीय. 

१९९९ : न्यूयॉर्क आणि ‘नॅसडॅक’मध्ये शाखा सुरू करणारी इन्फोसिस ही पहिली भारतीय कंपनी ठरली.

२००० : बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. पुढे दशकभर आपले स्थान टिकवले.

२००१ : भारतीय बनावटीच्या ‘तेजस’ या फायटर जेटने बेंगळुरूत आपले पहिले उड्डाण केले. 

२००३ : सानिया मिर्झाने विम्बल्डनची दुहेरी स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली. 

२००४ : राजवर्धनसिंह राठोडने ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत रौप्यपदक पटकाविले. 

२००५ : भारतात सर्वत्र माहितीचा अधिकार कायदा लागू झाला. भारतीय लोकशाही बळकट करणाऱ्या या कायद्याचे देशभरातून स्वागत झाले. 

२००६ : परिमर्जन नेगी हा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर होणारा सर्वांत तरुण आशियाई बुद्धिबळपटू ठरला. 

२००७ : प्रतिभा पाटील भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या. 

अभिनव बिंद्रा२००८ : अभिनव बिंद्राने बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले. या खेळात भारताला मिळालेले हे पहिले सुवर्णपदक होते. 

२००८ : भारताची यशस्वी चांद्रमोहीम. चंद्राचा पृष्ठभाग एकेकाळी द्रवरूप होता, असा निष्कर्ष चांद्रयानाने काढला.

२६ नोव्हेंबर २००८ : ‘लष्करे तैयबा’च्या  दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला. या साखळी हल्ल्यांत २०० जण मृत्युमुखी. एक दहशतवादी अजमल कसाब जिवंत. पाकिस्तानातून आल्याचे सिद्ध.

फेब्रुवारी २००९ : युरेनियम पुरवठ्यासाठी भारत-रशिया करार.

मे २००९ : केंद्रात पुन्हा एकदा काँग्रेसप्रणित आघाडी सरकार

डिसेंबर २००९ : तेलंगणला नवे राज्य म्हणून मंजुरी देण्याची सरकारची तयारी. विरोधकांची हिंसक निदर्शने. 

१३ फेब्रुवारी २०१० : पुण्यातील जर्मन बेकरी येथे स्फोट. 

मार्च २०११ : जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या १२,१०,१९३,४२२. उत्तर प्रदेश सर्वाधिक लोकसंख्येचे, तर सिक्कीम सर्वांत कमी लोकसंख्येचे राज्य. 

एप्रिल २०११ : ‘लोकपाल’ विधेयकाच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची दिल्लीतील ‘जंतर-मंतर’वर उपोषणाला सुरुवात. देशभर पडसाद. जगभर प्रसिद्धी

२५ जुलै २०१२ : देशाचे १३वे राष्ट्रपती म्हणून प्रणव मुखर्जी यांचा शपथविधी. 

१५ मे २०१४ : विक्रमी ३३६ जागा जिंकून भारतीय जनता पक्ष केंद्रात सत्तेवर. 

२६ मे २०१४ : नरेंद्र मोदी यांनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ. 

फेब्रुवारी २०१५ : दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाचा ७० पैकी ६७ जागा जिंकून विजय. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रिपदी.

जून २०१५ : भारत-बांगलादेशदरम्यान ऐतिहासिक करार. सीमेवर राहणाऱ्या नागरिकांना देश निवडण्याचा अधिकार. 

सप्टेंबर २०१५ : भारताने सुरू केली पहिली अंतराळ प्रयोगशाळा. भारताच्या मंगळ मोहिमेतील महत्त्वाची घटना. 

सप्टेंबर २०१६ : ३६ लढाऊ विमानांच्या खरेदीसंदर्भात भारत-फ्रान्स करारावर भारताची स्वाक्षरी. 

२९ सप्टेंबर २०१६ : भारतीय सैन्याचा पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘सर्जिकल स्ट्राइक’

आठ नोव्हेंबर २०१६ : पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा ऐतिहासिक निर्णय. 

डिसेंबर २०१६ : ५०० व दोन हजारच्या नवीन नोटा चलनात. 

१५ फेब्रुवारी २०१७ : ‘इस्रो’तर्फे आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून एकाच वेळी १०४ उपग्रह प्रक्षेपित. एवढ्या मोठ्या संख्येने उपग्रह अंतराळात सोडण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित. केवळ १८ मिनिटांत मोहीम फत्ते. 

रामनाथ कोविंद२५ जुलै २०१७ : राष्ट्रपतिपदी रामनाथ कोविंद. 

११ ऑगस्ट २०१७ : उपराष्ट्रपतिपदी व्यंकय्या नायडू.

ऑगस्ट २०१७ : लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १२५ वर्ष पूर्ण.


निर्मला सीतारमण
तीन सप्टेंबर २०१७ : पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार. निर्मला सीतारामन ठरल्या देशाच्या संरक्षणमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला. 

२५ सप्टेंबर २०१७ : ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू यांचे वयाच्या ७६व्या वर्षी निधन. मानुषी छिल्लर१८ नोव्हेंबर २०१७ : भारताची मानुषी छिल्लर ठरली ६७वी मिस वर्ल्ड.

चार डिसेंबर २०१७ : ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे निधन.

नऊ डिसेंबर २०१७ : ९१व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख.

१६ डिसेंबर २०१७ : कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड.

शशी कपूरतीन फेब्रुवारी २०१८ : १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत विजेता.

११ फेब्रुवारी २०१८ : महाराष्ट्राचे विकास साठ्ये यांना ऑस्कर पुरस्कार.

२२ फेब्रुवारी २०१८ : अवनी चतुर्वेदी – लढाऊ विमान उडवणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक.


२६ फेब्रुवारी २०१८ : वांद्रे येथे मराठी भाषेचे देशातील पहिले विद्यापीठ.

सात मार्च २०१८ : ईशान्येकडील तीन राज्यांत भाजप सत्तेत.

नऊ मार्च २०१८ : इच्छामरणाला सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी.

पतंगराव कदम१० मार्च २०१८ : ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पतंगराव कदम यांचे निधन

२५ मार्च २०१८ :महाराष्ट्राच्या कांची अडवाणीला मिस इंडियाचा बहुमान.

तीन एप्रिल २०१८ : ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचे निधन.

११ एप्रिल २०१८ : बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची भरीव कामगिरी, २६ सुवर्णपदकांसमवेत एकूण ६६ पदकांची कमाई.

१९ एप्रिल २०१८ : ९८व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी कीर्ती शिलेदार.

२५ मे २०१८ : कर्नाटक विधानसभेत कुमारस्वामी सरकारचे बहुमत सिद्ध.

१४ जून २०१८ : रायझिंग काश्मीरचे संपादक शुजात बुखारी यांची हत्या.

१८ जून २०१८ : महाराष्ट्रातील देवस्थांच्या अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा.

२० जून २०१८ : अनुकृती वास बनली फेमिना मिस इंडिया २०१८.

२२ जून २०१८ : रत्नाकर मतकरी, नवनाथ गोरेंना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर.

२३ जून २०१८ : महाराष्ट्रात सरसकट प्लॅस्टिकबंदी लागू.

२८ जून २०१८ : नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत मनू भाकरेला सुवर्ण.

पाच जुलै २०१८ : केंद्र सरकारची डीएनए तंत्रज्ञान विधेयकाला मंजुरी.

नऊ जुलै २०१८ : दिव्यांग तिरंदाजी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक.

११ जुलै २०१८ : फ्रान्सला मागे टाकून भारताची अर्थव्यवस्था जगात सहाव्या स्थानी.

११ जुलै २०१८ : बीएसएनएलकडून देशातील पहिल्या इंटरनेट टेलिफोनी सेवेची घोषणा.

१२ जुलै २०१८ : भारतीय धावपटू हिमा दासला ऐतिहासिक सुवर्णपदक.

१५ जुलै २०१८ : उत्तर प्रदेशात प्लास्टिकबंदी.

२० जुलै २०१८ : हिंदीतील कवी, गीतकार नीरज यांचे निधन. 

२० जुलै २०१८ : सॅनिटरी नॅपकिन जीएसटीमुक्त.

२६ जुलै २०१८ : सोनम वांगचूक आणि भारत वाटवानी यांना मॅगसेसे पुरस्कार.

एक ऑगस्ट २०१८ : भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी.

तीन ऑगस्ट २०१८ : ११वे विश्व हिंदी संमेलन मॉरिशसमध्ये.

चार ऑगस्ट २०१८ : ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा.

एम करुणानिधीसात ऑगस्ट २०१८ : द्रमुकचे सर्वेसर्वा एम. के. करुणानिधी यांचे निधन.

आठ ऑगस्ट २०१८ : रा. रं. बोराडे यांना साहित्यसेवा जीवनगौरव. 

नऊ ऑगस्ट २०१८ : राज्यसभेच्या उपसभापतिपदी हरिवंश नारायण सिंह.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search