Next
स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचे दुसरे पर्व
प्रेस रिलीज
Wednesday, March 28, 2018 | 12:07 PM
15 0 0
Share this story

पुणे : पर्सिस्टंट सिस्टिम्सतर्फे ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१८’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एमएचआरडी, एआयसीटीई, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, एनआयसी, मायजीओव्ही आणि आयफोरसीआयएस हे या उपक्रमाचे सहआयोजक आहेत. या ३६ तासांच्या सॉफ्टवेअर सत्राचे उद्घाटन ३० मार्च २०१८ रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे. 

‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. २७ केंद्रीय मंत्रालये व १७ राज्य सरकारांनी निश्चित केलेल्या समस्यांवर, सॉफ्टवेअर व हार्डवेअर हॅकेथॉनमधून प्रॅक्टिकल डिजिटल सोल्युशन्स बनविण्याचे आव्हान, भारतातील तंत्रज्ञानाच्या लाखो विद्यार्थ्यांपुढे ठेवणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे. सॉफ्टवेअर सत्राची अंतिम फेरी भारतामधील वेगवेगळ्या मुख्य केंद्रांमध्ये, ३० आणि ३१ मार्च २०१८ रोजी घेण्यात येणार आहे. 

डॉ. आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टिम्सयासंदर्भात ‘पर्सिस्टंट सिस्टिम्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आणि स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचे सहअध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे म्हणाले, ‘आम्हाला एमएचआरडी आणि एआयसीटीई यांच्याकडून मिळालेल्या सहकार्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. पर्सिस्टंट सिस्टिम्समध्ये निर्माण झालेली स्मार्ट इंडिया हॅकेथॉन ही एक साधी संकल्पना, आता एक देशव्यापी चळवळ झाली आहे. या उपक्रमाच्या पहिल्या पर्वाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे आम्हाला दुसरे पर्व सादर करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.’ 

डॉ. अभय जेरे, सचिव स्मार्ट इंडिया हॅकेथॉन आयोजन समितीस्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या आयोजन समितीचे सचिव, डॉ. अभय जेरे म्हणाले, ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन ही एक डिजिटल चळवळ आहे. त्यामुळे भारतातील तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांची सर्जनशीलता व कौशल्याचा उपयोग डिजिटल भारत घडविण्याच्या दिशेने होत आहे. या उपक्रमाच्या या पर्वामध्ये देशभरातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, हे पर्व यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहोत.’
 
‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१८’ची वैशिष्ट्ये :
प्रातिनिधिक फोटोसॉफ्टवेअर एडिशनमध्ये ३६ तासांची सॉफ्टवेअर प्रॉडक्ट डेव्हलपमेंट स्पर्धा असेल, तर हार्डवेअर एडिशनमध्ये संघ एकमेकांसोबत सलग पाच दिवस स्पर्धा करतील व अविरत आव्हाने देऊन, हार्डवेअर सोल्युशन्स तयार करतील.
 
२७ केंद्रीय मंत्रालये व १७ राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश यांनी एकत्र येऊन, सॉफ्टवेअर एडिशनसाठी तीनशे ४० समस्या, तर हार्डवेअर एडिशनसाठी ६८ समस्या शोधल्या आहेत. सॉफ्टवेअर एडिशन्स २८ केंद्रांमध्ये आणि हार्डवेअर एडिशन्स ११ केंद्रांमध्ये होणार आहेत.
 
२४ संकल्पनांमधून शासकीय विभागातर्फे समस्या शोधण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये पर्यावरण, अंतराळ, माहिती तंत्रज्ञान, आरोग्य आणि शिक्षण यांचा समावेश आहे.

सतरा हजारांपेक्षा अधिक सहभागींमधून एक हजार दोनशे ९६ संघ अंतिम फेरीकरिता निवडण्यात आले असून, प्रत्येक संघामध्ये सहा विद्यार्थी आणि उद्योग क्षेत्रातील किंवा शैक्षणिक विभागातील दोन मार्गदर्शक असतील.

पर्सिस्टंट सिस्टिम्सतर्फे फेसबुकवर लाईव्ह प्रशिक्षण घेण्यात आले आणि विद्यार्थ्यांकरिता मुक्त प्रशिक्षण सत्रे प्रसारित करण्यात आली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link