Next
जोतिबाच्या यात्रेसाठी वाडी रत्नागिरीला भक्तांची गर्दी
BOI
Friday, April 19, 2019 | 05:24 PM
15 0 0
Share this article:

वाडी रत्नागिरी (जि. कोल्हापूर) : येथील जोतिबाच्या यात्रेला सुरुवात झाली असून, भाविकांनी दर्शन घेण्यासाठी जोतिबा डोंगरावर गर्दी केली आहे. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर करत भाविकांनी गुलाल-खोबऱ्याची मुक्त उधळण केली. 

चैत्र महिना सुरू झाला, की भाविकांना जोतिबा यात्रेचे वेध लागतात. या महिन्यात प्रत्येक रविवारी जोतिबा डोंगरावर भक्तांची गर्दी होते. पौर्णिमेच्या दिवस म्हणजे यात्रेचा मुख्य दिवस असतो. त्यामुळे आज (१९ एप्रिल) जोतिबाच्या डोंगरावर भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. आजच्या दिवसापासून मंदिरात दररोज श्रींच्या छाबिन्याची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. हा नेत्रदीपक सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात. 


मानाच्या सासन काठ्यांची भाविक मिरवणूक काढत असल्यामुळे डोंगरावर भाविकांची गर्दी झाली आहे. गुलाल खोबरे, दवना व प्रासादिक वस्तूंच्या विक्रीतून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. उन्हाची तमा न बाळगता भाविक जोतिबाच्या नामघोषात तल्लीन झाले आहेत. जोतिबाच्या यात्रेला गेलेले भाविक कोल्हापुरातील श्री महालक्ष्मीचे दर्शन घ्यायला जात असल्यामुळे कोल्हापूर शहरातही भाविकांची दाटी झाली आहे. बस स्थानकात खास यात्रेसाठी जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. 

(जोतिबा डोंगर या धार्मिक पर्यटनस्थळाविषयी अधिक माहिती देणारा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search