Next
सोनसळी
BOI
Wednesday, July 31, 2019 | 11:57 AM
15 0 0
Share this article:

एका ब्राह्मण कन्येच्या आयुष्यात घडलेल्या घटनांवर आधारित असलेली ‘सोनसळी’ ही आयडा बॅरेटो यांची ललितरम्य कादंबरी आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या,नातेसंबंध जपणाऱ्या माणसांची ही कहाणी आहे. या कादंबरीविषयी लेखिकेने लिहिलेले हे दोन शब्द...
.....................................
‘सोनसळी’ ही कादंबरी, सोनसळी या ब्राह्मणकन्येच्या अल्पायुष्यात घडलेल्या घटनांवर आधारित आहे. ओंकारेश्वर, त्यांची पत्नी अमृता, त्यांचा मुलगा शंभुनाथ, मुलगी वत्सला आणि सोनसळीची ही कहाणी आहे. ती एक पावसाळी कुंद दुपार होती. त्या वेळी मी घरी एकटीच होते. माझ्या समोरील खिडकीच्या काचेवर रेंगाळणारे व नंतर ओघळून संपून जाणारे पावसाचे थेंब मला त्या वेळी उगाच अस्वस्थ करत होते. मी विचार करत होते, प्रत्येक माणसाचे आयुष्यही या पावसाच्या ओघळणाऱ्या थेंबांप्रमाणे प्रत्येक दिवशी घरंगळून शेवटी संपून जात असावे का? 

या विचारात मी असतानाच त्या उदास एकांतात ती अचानक माझ्या समोर आली. मी तिच्याकडे पाहत असताना ती हलकेच हसत मला म्हणाली, ‘मी शंभुनाथ भटाची सोनसळी..’ त्याच क्षणी या कादंबरीला सुरुवात झाली आणि ती संपूनही गेली होती. परंतु ती सौंदर्यवान सोनसळी माझ्या व कदाचित तुमच्यादेखील मनाच्या गाभाऱ्यात खोल कुठेतरी रुतून राहिली आहे. एखादे अस्तित्व निर्माण झाल्यानंतर ते अस्तित्व कधीतरी संपून जातेच; पण असे असले तरी आठवणीच्या कवडशात ते सदैव राहते. असेच सोनसळीचे ते सुंदर अस्तित्व माझ्या आठवणीच्या कवडशात सदैव राहिले आहे व पुढेदेखील राहील. कारण,            
मनी मानसी व्यर्थ चिंता वाहते
अकस्मात होणार, होऊन जाते 
घडे भोगणे सर्वही कर्म योगे
मतीमंद ते खेद माजी वियोगे..

पुस्तक : सोनसळी
लेखिका : आयडा बॅरेटो
प्रकाशक : मुक्ता पब्लिशिंग हाउस प्रा. लि. 
पृष्ठे : ५९२
मूल्य : ५७० रुपये
ई-मेल : authorida@gmail.com

(हे ई-बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search