Next
‘गुरुकुल’च्या विद्यार्थ्यांचे मूकबधिर विद्यालयात रक्षाबंधन
रत्नागिरीतील नानल गुरुकुल आणि अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाचा उपक्रम
BOI
Monday, August 27, 2018 | 03:30 PM
15 0 0
Share this article:

कै. के. प. अभ्यंकर विद्यालयात रक्षाबंधन करताना अॅड. बाबासाहेब नानल गुरुकुलच्या विद्यार्थिनी.रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या शिर्के प्रशालेतील अॅड. बाबासाहेब नानल गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात जाऊन रक्षाबंधनाचा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला. दिव्यांग विद्यार्थ्यांना आमचे कायम सहकार्य मिळेल, अशी ग्वाहीच जणू या विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून दिली.

दर वर्षी नानल गुरुकुलतर्फे हा रक्षाबंधनाचा उपक्रम पोलिस ठाणे, एसटी आगारातही करण्यात येतो. गुरुकुलमधील इयत्ता सातवी, आठवीतील सुमारे ५० विद्यार्थी शनिवारी (२५ ऑगस्ट २०१८) दुपारी मूकबधिर विद्यालयात पोहोचले. अगदी घरच्याप्रमाणे बंधुरायाला ओवाळून बहिणींनी राखी बांधली. दोन्ही शाळांतील विद्यार्थ्यांनीही एकमेकांना राखी बांधली. काही भावांनी बहिणींना देण्यासाठी भेटवस्तूही आणल्या होत्या, हे विशेष. त्यानंतर सर्वांनी गोड खाऊचा आस्वाद घेतला.

या उपक्रमासाठी ‘गुरुकुल’चे शिक्षक स्वप्नील कर्लेकर, सुशांत पवार, सुदेश निवळकर, विनिता मयेकर, तसेच मूकबधिर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनुराधा ताटके, सहशिक्षक सीमा मुळ्ये, गजानन रजपूत, रमेश घवाळी व अन्य शिक्षक उपस्थित होते.

(या अनोख्या रक्षाबंधनाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search