Next
‘उल्लू अॅप’च्या ‘हलाला’ या नवीन मालिकेचे अनावरण
मिलिंद जाधव
Wednesday, March 27, 2019 | 04:48 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म ‘उल्लू अॅप’ आता ‘हलाला’ ही एक नवीन मालिका प्रदर्शित करण्यास सज्ज झाले आहे. २९ मार्चला प्रदर्शित होत असलेली ही मालिका मुस्लीम समाजातील ‘ट्रिपल तलाक’ या संकल्पनेवर भाष्य करणारी आहे. अशा घटस्फोटानंतर त्या महिलेची होणारी परिस्थिती यातून दाखवण्यात येणार आहे.

चित्रपट निर्माते, उद्योजक विभू अग्रवाल यांनी या मालिकेची निर्मिती केली असून, दिपक पांडे यांनी ही मालिका दिग्दर्शित केली आहे. ‘इश्क सुभान अल्लाह’ या मालिकेला मिळालेली प्रचंड लोकप्रियता व त्याच दरम्यान ‘कोड ब्लू’ हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेल्या वेबसिरीजनंतर ‘उल्लू अॅप’प्रस्तूत ‘हलाला’ मालिकेने या विषयावर भाष्य केले आहे. या मालिकेत केवळ देशभरातीलच नव्हे, तर आशियातील मुस्लीम वर्चस्व असलेल्या क्षेत्रांत मुस्लिम महिलेला देण्यात येणाऱ्या ट्रिपल तलाकनंतर तिच्या आयुष्यात उद्भवलेल्या समस्या यांवर प्रकाश टाकला आहे. 

ही कथा एका जोडप्याच्या भोवताली फिरते. एका निर्भीड महिलेचा प्रवास आणि तिची समाजाशी सुरू असलेली लढाई म्हणजे ‘हलाला’. या कथेतील पात्रांसाठी कलाकारांची निवड करणे, ही एक क्लिष्ट प्रक्रिया होती, असे सांगण्यात आले आहे. ‘दिया और बाती हम’ या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्री दीपिका सिंग, ‘जोधा अकबर’ या चित्रपटातील रवी भाटिया, ‘चिडिया घर’ या प्रसिद्ध कॉमेडी मालिकेतील शफ़ाक नाज़, ‘मोह मोह के धागे’ फेम एजाज़ खान हे कलाकार या मालिकेतून दिसणार आहेत. याशिवाय नृत्यांगना नीलिमा अज़ीमदेखील या मालिकेचा भाग असतील. 

‘उल्लू अॅप’ या डिजिटल मंचावर प्रेक्षकांना नाटक, भयपट, रहस्यमय, विनोदी अशा विविध प्रकारच्या वेबसिरीज पाहण्यास मिळणार आहेत. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search