Next
आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांना आरक्षणाचा निर्णय स्वागतार्ह
खासदार शिरोळे यांची प्रतिक्रिया
BOI
Tuesday, January 08, 2019 | 05:53 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘उच्च जातीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी नोकऱ्या व शिक्षणसंस्थांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय ऐतिहासिक आणि न्यायाला धरून आहे. मी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करतो’, अशी प्रतिक्रिया खासदार अनिल शिरोळे यांनी व्यक्त केली. 

 ते म्हणाले, ‘पुरेशी आर्थिक कुवत नसल्याने गुणवत्ता असूनही शिक्षण घेण्यात मर्य़ादा येणाऱ्या आर्थिक दुर्बलांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. हा एकाच जातीसाठीचा किंवा धर्मासाठीचा विषय नसल्याने सर्वांनाच लाभ देणारा हा निर्णय खऱ्या अर्थाने ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषणेचे प्रतिबिंब असलेला आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे सामाजिक अंतर कमी होउन एकोपा निर्माण होण्यासही हातभार लागणार आहे.’ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Balgramopadhye About 152 Days ago
Cast cannot be a factor in deciding poverty . The two ideas are not related ,neither in theory , nor in life .
0
0

Select Language
Share Link
 
Search