Next
डॉ. कुलकर्णी यांना मुंबई विद्यापीठाचा आदर्श शिक्षक पुरस्कार
BOI
Tuesday, January 29, 2019 | 12:08 PM
15 0 0
Share this story

सांताक्रूझ येथील फिरोजशहा मेहता सभागृहात डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांना पुरस्कार देताना कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर.

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रफुल्लदत्त प्रभाकर कुलकर्णी यांना मुंबई विद्यापीठाचा २०१७-१८चा आदर्श शिक्षक पुरस्कार कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अध्ययन, अध्यापन संशोधन क्षेत्रात निष्ठेने व कळकळीने केलेल्या बहुमोल कामगिरीबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.

प्रजासत्ताकदिनी विद्यानगरी, सांताक्रूझ येथील फिरोजशहा मेहता सभागृहात हा कार्यक्रम झाला. प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह व पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. कुलकर्णी हे महाविद्यालयात ३२ वर्षांपासून रसायनशास्त्राचे अध्यापन करत आहेत. सध्या कामराज विद्यापीठ (तामिळनाडू) व मुंबई विद्यापीठाचे पी. एचडीचे ते मार्गदर्शक आहेत. विद्यापीठ अनुदान आयोग, मुंबई विद्यापीठाचे लघु, महत्तम प्रकल्प संशोधन प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. त्यांचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.

त्यांनी बँकॉक (थायलंड) येथील परिषदेत शोधनिबंध सादर केला असून, महाविद्यालयाच्या तसेच, मुंबई विद्यापीठाच्या विविध महत्त्वाच्या समित्यांवर काम केले आहे. महाविद्यालयाचा आदर्श शिक्षक पुरस्कार, राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप, मुंबई पत्रकार संघ, विद्यापीठाचा २००७ सालचा राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कार तसेच दिल्ली येथे इंडो-नेपाळ एकता अ‍ॅवॉर्डने ते सन्मानित आहेत. शोधनिबंधांमध्ये मौखिक व पोस्टर सादरीकरणातही प्रथम क्रमांक मिळवला आहे.

अध्यापनाबरोबर रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मराठी विज्ञान परिषदेचे समन्वयक म्हणून ते गेली दहा वर्षे विज्ञान प्रसार, प्रचाराचे कार्य करत आहेत. महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाच्या आयएओ प्रमाणपत्र मिळवण्यात समन्वयक म्हणून नावलौकिक प्राप्त करून दिला. डीएसटी-फिस्टचे सादरीकरण व निधी प्राप्त होण्यामध्ये त्यांचा सहभाग होता. व्याख्याने, कार्यशाळा आयोजन, संयोजन, तज्ञ व्यक्ती म्हणून त्यांनी योगदान दिले आहे. आकाशवाणीवरही त्यांनी व्याख्याने दिली आहेत.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, उपप्राचार्य विवेक भिडे, रत्नागिरी शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, सचिव सतीश शेवडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link