Next
उमेश झिरपे लिखित ‘मुलांसाठी गिर्यारोहण’ पुस्तकाचे प्रकाशन
BOI
Monday, July 29, 2019 | 05:43 PM
15 0 0
Share this article:

‘मुलांसाठी गिर्यारोहण’ पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी श्रीपाद गोखले, आनंद पाळंदे, मीना प्रभू, देवेंद्र कुमार, उमेश झिरपे व रोहन चंपानेरकर

पुणे : शालेय विद्यार्थ्यांना गिर्यारोहणाची माहिती व्हावी, या उद्देशाने श्री शिव छत्रपती पुरस्कार विजेते ज्येष्ठ गिर्यारोहक व गिरिप्रेमीच्या अष्टहजारी शिखर मोहिमांचे नेते उमेश झिरपे यांनी लिहिलेल्या ‘मुलांसाठी गिर्यारोहण’ या गिर्यारोहणाचे प्राथमिक धडे देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच प्रसिद्ध लेखिका मीना प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले. 

‘गिरिप्रेमी’ची गिर्यारोहण प्रशिक्षण संस्था ‘गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग’च्या गिरिस्पंदने या वार्षिक संमेलनाचे आयोजन शनिवारी, २७ जुलै २०१९ रोजी करण्यात आले होते. त्या वेळी हा पुस्तक प्रकाशन कार्यक्रम झाला. 

या वेळी मुळचे दार्जीलिंगचे व सध्या हिंजवडी येथील पवार पब्लिक स्कूलचे प्रिन्सिपॉल म्हणून कार्यरत असलेले देवेंद्र कुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गिरिप्रेमीचे संस्थापक सदस्य आनंद पाळंदे, ‘रोहन प्रकाशन’चे रोहन चंपानेरकर, गिरिप्रेमीचे सदस्य व मार्गदर्शक श्रीपाद गोखले यांची प्रमुख उपस्थिती होती. गिरिप्रेमीचे एव्हरेस्ट शिखरवीर व कांचनजुंगा शिखरवीरदेखील कार्यक्रमाला उपस्थित होते.

शालेय विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेऊन उमेश झिरपे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. यात गिर्यारोहण म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते, त्यासाठी कोणती पूर्व तयारी करावी लागते, कोणत्या साधनांची आवश्यकता असते, याबाबत झिरपे यांनी ओघवत्या भाषेत भाष्य केले आहे. 

गिर्यारोहणासंबंधी मार्गदर्शक असलेल्या या पुस्तकात ट्रेकिंग करताना निसर्गाची घ्यावयाची अनुभूती, जंगलातील आयुष्य, नद्या, मातीचे प्रकार इत्यादी विषयी अत्यंत उपयुक्त व रंजक माहिती समाविष्ट केली आहे. हे पुस्तक मराठी भाषेत असून, लवकरच याची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित करण्यात येणार आहे. रोहन प्रकाशनने पुस्तक प्रकाशित केले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search