Next
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात
प्रेस रिलीज
Friday, September 07, 2018 | 04:24 PM
15 0 0
Share this article:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिक्षकदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रा. विजया सरोदे यांच्यासह प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी आदी

पुणे : औंध येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिक्षक दिन विविध उपक्रमांनी, उत्साहात साजरा  झाला. एक दिवसासाठी विद्यार्थ्यांनी प्राचार्य, प्राध्यापक आणि शिपाई या भूमिका पार पाडल्या. विद्यार्थी शिक्षकांचा सत्कार आणि शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी इंग्रजी विषयाच्या सेवानिवृत्त प्रा. विजया सरोदे उपस्थित होत्या. 

प्रा. विजया सरोदे यांचा सत्कार करताना  प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे
त्या म्हणाल्या, ‘आपल्या जन्मापासूनच आपण इतरांकडून अनेक गोष्टी शिकत असतो. ते सर्वजण आपले शिक्षक असतात. सर्वप्रथम आई ही आपली शिक्षिका असते. त्यानंतर आपले  कुटुंब, समाज आणि निसर्गही काही ना काहीतरी शिकवित असतो. आपणास लिहायला वाचायला शिकवणारे शिक्षक आपणास घडवितात. या सर्वांविषयीचा आदर व्यक्त करण्यासाठीच आपण शिक्षक दिन साजरा करीत असतो.’ 
 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे म्हणाल्या, ‘जागतिकीकरणात शिक्षण व्यवस्था वेगाने बदलत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या जबाबदाऱ्या आणखी वाढल्या आहेत. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्याबरोबरच, त्यांच्या कलागुणांचा विकास करून, चांगला नागरिक बनवण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये रुजवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याची जबाबदारी शिक्षकांना पार पाडावी लागणार आहे.’  

या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, डॉ. संजय नगरकर, डॉ. सुहास निंबाळकर यांच्या हस्ते विद्यार्थी शिक्षकांना, तर प्रा. विजया सरोदे यांच्या हस्ते सर्व प्राध्यापकांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती पारितोषिक विजेते वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढोमे यांनी सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुहास निंबाळकर यांनी, तर डॉ. विलास सदाफळ यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search