Next
‘शिक्षकांनी खुर्चीची योग्यता वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत’
BOI
Tuesday, September 25, 2018 | 06:10 PM
15 0 0
Share this article:

विचार मांडताना शिल्पाताई पटवर्धनरत्नागिरी : ‘शिक्षक हा शाळेचा कणा आहे. शिक्षकांच्या खुर्चीची योग्यता वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. शिक्षकांनी एकमेकांना समजून घ्यावे. शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचे काम संस्थेचे आहे. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी प्रत्येक घटक संस्थेच्या गुणवत्ता सुधारासाठी प्रयत्न करते,’ असे प्रतिपादन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन यांनी केले.

ल. ग. पटवर्धन प्राथमिक शाळा आणि मालतीबाई जोशी बालक मंदिरामधील ३५ शिक्षकांसाठी नुकतीच प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या कार्यशाळेच्या उद्घाटनावेळी त्या बोलत होत्या. गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत डॉ. चित्रा गोस्वामी यांनी कार्यशाळा आयोजित केली होती. 

निवृत्त शिक्षिका सुनीता पाटणकर यांनी ‘पालक व शिक्षकांचे नाते’ या विषयावर मार्गदर्शन केले. ‘शिक्षक ही व्यक्ती असण्यापेक्षा वृत्ती असावी. आपण पालकही आहोत आणि शिक्षकही. पालकांनी शिक्षकांना समजून घ्यावे. हा सहसंबंध असतो. पालकांच्या सहकार्याने शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करावे. शिक्षकी पेशा म्हणजे व्रत आहे, ते पूर्णत्वाला न्यावे,’ असे त्या म्हणाल्या.

दुसऱ्या सत्रात जयवंत बोरसे यांनी बदलत्या शिक्षण पद्धतीवर आपले विचार व्यक्त केले. ‘टायपिंग सेंटर्सनी आपले रूप बदलले. त्याप्रमाणे काळानुसार प्राथमिक शिक्षण बदलले आहे. पाठांतरापेक्षा व एकांगी शिकवण्यापेक्षा विद्यार्थ्यांची स्वयंअध्ययन व संशोधन प्रवृत्ती जागृत करावी. त्यामुळे शिक्षकांवरचा ताण कमी होऊ शकतो. ब्लॉग, फेसबुक, वेबपेज, व्हॉट्सअॅपचा उपयोगही शिक्षण प्रक्रियेत करता येईल,’ असे ते म्हणाले.

डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी ‘स्मार्ट विद्यार्थी स्मार्ट शिक्षक’ या विषयावर मते मांडली. ‘स्मार्ट या शब्दाचा खरा अर्थ शिक्षकांच्या दृष्टीने निरोगी, ज्ञानी, सक्षम, प्रतिसादी, स्वयंप्रेरित असावा. शिक्षकांचे विचार न थांबणारे आणि समृद्ध असावेत. वेशभूषा व देहबोली आदर्श असावी. निरंतर ज्ञान घेण्याची वृत्ती असावी. समोरच्या पिढीला ओळखून स्वत:मध्ये बदल करता आला पाहिजे. स्मार्ट शिक्षकांची भाषा स्वच्छ, स्पष्ट असावी, सुलेखन असावे. आधी आपण करावे व नंतर विद्यार्थ्यांना सांगावे,’ असे ते म्हणाले.

या वेळी शालेय समिती प्रमुख मनोज पाटणकर, समितीप्रमुख नथुराम देवळेकर, मालतीबाई जोशी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अनिल गार्डी, मुख्याध्यापिका आसक्ती भोळे, शिक्षिका सायली राजवाडे आदी या वेळी उपस्थित होते.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search