Next
राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा १८ जानेवारीपासून
प्रेस रिलीज
Tuesday, January 15, 2019 | 05:48 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘होरांगी तायक्वांदो अकादमीतर्फे तिसऱ्या ‘खुल्या राष्ट्रीय तायक्वांदो चॅम्पियनशिप’चे आयोजन खराडी येथील कै. राजाराम भिकू पठारे स्टेडियम येथे १८ ते २० जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे,’ अशी माहिती स्पर्धेचे आयोजक बाळकृष्ण भंडारी यांनी दिली.

या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा १९ जानेवारी २०१९ रोजी सकाळी १० वाजता माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे उपाध्यक्ष सोमनाथ शिंदे, नगरसेवक महेंद्र पठारे, नगरसेविका संजिला पठारे, नगरसेविका सुमन पठारे, नगरसेवक अॅड. भैय्यासाहेब जाधव, सामाजिक कार्यकर्ते मुकुंद राजगुरू आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेत मणिपूर, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा अशा विविध राज्यांतील सुमारे १०० स्पर्धक सहभागी होणार आहेत. मुले आणि मुलींच्या ‘पुमसे’ आणि ‘फाइट्स’ या दोन प्रकारांत ही स्पर्धा होणार असून, या स्पर्धेत सर्व वयोगटांतील सामने होणार आहेत. स्पर्धेतील सुवर्णपदक आणि रौप्यपदक विजेत्या १०० खेळाडूंना साउथ कोरियातील चोसन विद्यापीठाद्वारे तायक्वांदोचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे; तसेच विद्यापीठाकडून मोफत राहण्याची आणि प्रशिक्षणाची सोय केली जाणार आहे. या खेळाडूंना विद्यापीठाकडून शिष्यवृत्तीदेखील दिली जाईल. या खेळाडूंना गव्हांजू इंटरनॅशनल तायक्वांदो अकादमीकडून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

स्पर्धेविषयी बोलताना आयोजक भंडारी म्हणाले, ‘या स्पर्धेत दरवर्षी हजारो खेळाडू सहभागी होतात. देशात तायक्वांदोचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि खेळाडूंना संधी मिळावी यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते. हे स्पर्धेचे तिसरे वर्ष असून, खेळाडूंना आपली चमक दाखविण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search