Next
भगिनी निवेदिता बँकेतर्फे महिलांसाठी ‘उत्कर्षा कर्ज योजना’
प्रेस रिलीज
Thursday, March 08, 2018 | 04:43 PM
15 0 0
Share this story

'उत्कर्षा कर्ज योजनेची माहिती देताना भगिनी निवेदिता बँकेच्या अध्यक्षा जयश्री कुरूंदवाडकर,समवेत उपाध्यक्षा रेवती पैठणकर,मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देशपांडे

पुणे : ‘महिलांनी सर्वांसाठी चालविलेली बँक अशी ओळख असलेल्या भगिनी निवेदिता सहकारी बँकेतर्फे महिला दिन अर्थात गुरूवारी, आठ मार्चपासून  खास महिलांसाठी प्रथमच ‘उत्कर्षा कर्ज योजना’ आणली आहे’, अशी माहिती बँकेच्या अध्यक्षा जयश्री कुरूंदवाडकर यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली.‘बँकेचा ४४ वा वर्धापन दिन येत्या २४ मार्च रोजी साजरा होत आहे. याचेच औचित्य साधत शनिवार, २४ मार्चपर्यंत या कर्ज योजनेचा लाभ ग्राहकांना घेता येईल. ही योजना फक्त महिलांसाठीच असून भगिनी निवेदिता सहकारी बँकेत खाते असलेल्या आणि नसलेल्या सर्वच महिलांना त्यांच्या विविध गरजांसाठी या कर्ज योजनेचा लाभ घेता येणार आहे.’असेही त्यांनी सांगितले.  

‘२४ मार्च १९७४ रोजी चार्टर्ड अकाउंटंट विवेक दाढे आणि त्यांच्या पत्नी मिनाक्षी दाढे यांनी भगिनी निवेदिता सहकारी बँकेची स्थापना केली. बँकेची स्वच्छ, पारदर्शी, कार्यक्षम, सौजन्यपूर्ण सेवा देणारी तसेच मजबूत आर्थिक स्थिती असलेली बँक अशी जनमानसात प्रतिमा आहे. सर्वसमावेशक धोरण राबवताना समाजातील सर्वसामान्य जनता, कष्टकरी वर्ग, सावकारी पाशात अडकलेले मध्यमवर्गीय छोटे उत्पन्न गट, विशेषत: महिला यांना आर्थिक दृष्ट्या प्रशिक्षित करून बँकिंग साक्षरता विकसित करणे हा बँकेचा मुख्य उद्देश होता. याच उद्देशाचा पाठपुरावा करीत बँकेचा ४४ वर्षांचा हा प्रवास महत्त्वपूर्ण आहे. हे औचित्य साधत आम्ही महिलांसाठी प्रथमच अशी  योजना जाहीर करीत आहोत.’ असे कुरुंदवाडकर यांनी नमूद केले.
 
‘या योजनेत भगिनी निवेदिता सहकारी बँकेतर्फे महिलांना वैयक्तिक व व्यावसायिक कारणांसाठी (महिलांचा प्रोपायटर / पार्टनर / डायरेक्टर / ट्रस्टी म्हणून सहभाग असलेले व्यवसाय) कर्ज खास सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेचा कालावधी आठ मार्च ते शनिवार, २४ मार्चपर्यंत राहणार आहे. प्रचलित असणाऱ्या ११ टक्के ते त्यापेक्षा जास्त व्याजदराच्या तुलनेत या योजनेअंतर्गत ८.४८  व ८.८८ टक्के  इतक्या सवलतींच्या दरात या कालावधीमध्ये कर्ज उपलब्ध होणार आहे,’ अशी माहिती बँकेच्या उपाध्यक्षा रेवती पैठणकर यांनी दिली.  ‘या योजनेअंतर्गत कर्जदार किंवा भागीदार, संचालक, ट्रस्टी यांच्यापैकी एका व्यक्तीचा एका वर्षाचा एक लाख रुपये रकमेचा  अपघात विमा बँकेमार्फत करण्यात येईल’, असेही त्यांनी सांगितले.

‘या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे या अंतर्गत वैयक्तिक कारणासाठी कर्जे (उदा.घरदुरूस्ती/वस्तुखरेदी/ जुनी कर्जफेड/वाहनखरेदी/फर्निचर/पर्यटन), घरखरेदी, व्यवसायासाठी कर्जाची मागणी करता येईल. तारणी कर्जांतर्गत फर्निचर, वाहनखरेदी, व्यवसायासाठी लागणारी यंत्रे अथवा उपकरणे, मशिनरी, जागेच्या तारणावरील कर्जे, घरतारण कर्जे, स्टॉक व बुकडेट्स इत्यादीच्या तारणावरील कॅशक्रेडिट कर्जे यांचा देखील समावेश आहे’, असे बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देशपांडे यांनी नमूद केले.

‘पुणे जिल्ह्यात बँकेच्या एकूण १८ शाखा असून बँकेचे ढोबळ अनुत्पादित कर्ज (ग्रॉस एनपीए) एक टक्क्यापेक्षा कमी असून, गेली सतरा वर्षे सातत्याने बँक १५ टक्के लाभांश देत आहे. सध्या बँकेची वार्षिक उलाढाल ही जवळपास १३०० कोटी रुपये  असून नजीकच्या भविष्यात वार्षिक ही उलाढाल   १५०० कोटीपर्यंत नेण्याचा मानस आहे. सध्या बँक  मोबाईल बँकिंग, आयएमपीएस आदी सेवा देता आहे. लवकरच इंटरनेट बँकिंगसेवा सुरू करत आहे.’ असेही त्यांनी या वेळी सांगितले.  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link