Next
टाटा पॉवरतर्फे जलसाक्षरता जनजागृती फेरी
प्रेस रिलीज
Wednesday, October 17 | 06:19 PM
15 0 0
Share this story

पुणे : पाणी वाचवण्याचा संदेश देण्यासाठी  टाटा पॉवरतर्फे   पळसवडे येथील देवापूर गावात ‘पाणी वाचवण्यासाठी आम्ही चालतो’ (वी वॉक्स फॉर सेव्ह द वॉटर) या जनजागृती फेरीचे आयोजन केले होते.

अनियमित पाऊस, वाढती लोकसंख्या आणि कारखान्यांची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर पाण्याचा वापर नियोजित पद्धतीने व्हावा याकरिता जलसाक्षरतेच्या प्रसारासाठी हा फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यात सुमारे सोळाशे लोक सहभागी झाले होते. टाटा पॉवरचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, खेळाडू, सरकारी अधिकारी, विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांचा यात सहभाग होता. 

या वेळी टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिन्हा म्हणाले, ‘पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत भविष्याच्या निर्मितीसाठी टाटा पॉवरतर्फे आम्ही सातत्याने विविध उपक्रम राबवत असतो. या मोर्चाला लोकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे, आमच्या उपक्रमामध्ये सहभागी होण्यास समाजघटकांना प्रोत्साहन देण्याच्या आमच्या उद्दिष्टावर शिक्कामोर्तब झाले आहे. पर्यावरणस्नेही समाजघटकांचा देश उभारून एक शाश्वत पर्यावरण निर्माण करण्याची आपली बांधिलकी अधिक दृढ करण्याचा टाटा पॉवरचा प्रयत्न आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link