Next
कॅरम राज्य स्पर्धेत ‘शिर्के’ची बाजी
BOI
Thursday, November 02 | 04:40 PM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : मुंबई येथील सायन क्रीडा संकुलात झालेल्या राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत येथील शिर्के प्रशालेना ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. या शाळेच्या निर्वाण कांबळेने १४ वर्षांखालील गटात विजेतेपद मिळवले, तर १९ वर्षांखालील गटात अपूर्व नाचणकर उपविजयी ठरली. या स्पर्धेत जिल्ह्यातील चार खेळाडूंची राज्याच्या संघात निवड झाली आहे.

मुंबईत झालेल्या राज्य कॅरम स्पर्धेत जिल्ह्यातील चार खेळाडूंनी सहभाग घेतला होता. १४ वर्षांखालील गटाच्या अंतिम फेरीत शिर्के प्रशालेच्या निर्वाण कांबळेने मुंबईच्या बलाढ्य कॅरमपटूला नमवत ऐतिहासिक कामगिरी केली. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात निर्वाणने पहिला सेट १७-४ ने जिंकला. दुसरा सेट त्याला ४-१३ ने गमवावा लागला; मात्र तिसरा सेट १५-१ ने जिंकत हा सामना २-१ असा खिशात घातला. तत्पूर्वी निर्वाणने गतवर्षीचा राज्य विजेत्या सिंधुदुर्गच्या खेळाडूला उपउपांत्य सामन्यात पराभूत करून अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला होता.

१९ वर्षांखालील गटात अपूर्व नाचणकरला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. सहा राष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव असलेल्या नाचणकरने अंतिम फेरीत चांगलीच झुंज दिली. १७ वर्षांखालील गटात शिर्के हायस्कूलच्याच दुर्वा देसाईने सहावे, तर आकांक्षा कदमने १४ वर्षांखालील गटात तिसरे स्थान पटकावले. या चारही खेळाडूंची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. या विजयात शिर्के प्रशालेचे क्रीडा शिक्षक विनोद मयेकर यांची मोलाची कामगिरी आहे.

मुख्याध्यापक बी. डी. पवार, उपमुख्याध्यापक सी. एस. पाटील, श्री. माळगे, कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, विजय साखळकर, सतीश शेवडे, मनोज पाटणकर, प्रदीप भाटकर, सचिव मिलिंद साप्ते, खजिनदार नितीन लिमये यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link