Next
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तपासणी शिबिर
प्रेस रिलीज
Wednesday, June 06 | 05:08 PM
15 0 0
Share this story

पुणे : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे फुफ्फुस तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

‘हवेतील प्रदूषणाचे प्रमाण सातत्याने वाढत असून, यामुळे जीवघेण्या आजारांचे प्रमाण देखील वाढत आहेत. त्यासाठी आपण सर्वांनीच पुढाकार घेऊन पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे; तसेच फुफ्फुसाचा वाढत्या आजारांच्या पार्श्वभूमीवर हे तपासणी शिबिर अत्यंत महत्त्वाचे आहे,’ असे मत खासदार वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले.

या शिबिराचे आयोजन अनिल मंद्रूपकर यांच्या पुढाकाराने झाले. यात सुमारे ७० लोकांची तपासणी करण्यात आली. या प्रसंगी नगरसेवक रवींद्र माळवदकर, रत्नप्रभा जगताप, अशोक राठी, मिलिंद वालवडकर, विपुल म्हैसूरकर, डॉ. सुनीता मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link