Next
फोर सिलिंडर पॉवरट्रेनमुळे ‘जॅग्वार एफ’ अधिक कार्यक्षम
प्रेस रिलीज
Monday, July 23, 2018 | 12:05 PM
15 0 0
Share this story

मुंबई : जॅग्वार लँड रोव्हर इंडियाने जॅग्वार एफ टाइपला अत्याधुनिक चार सिलिंडर इंजेनियम पेट्रोल इंजिन लावून जॅग्वार एफच्या क्षमता आणखी विस्तारल्या आहेत.

पुरस्कारप्राप्त एफ टाइप आता सुरुवातीपासूनच चार सिलिंडर मॉडेलपासून एफ टाइप एसव्हीआर जॅग्वारच्या ताशी ३२२ किलोमीटर मॉडेलपर्यंत विस्तारलेले आहे. २२१ केडब्ल्यूच्या २.०१ टर्बोचार्जड पेट्रोल मोटरच्या या संपूर्ण अॅल्युमिनियम स्पोर्ट्स कारमुळे जॅग्वार स्पोर्ट्स कारला अधिक चपळता, कार्यक्षमता आणि वाजवी किंमत प्राप्त झाली आहे.

इंजेनियम इंजिनमुळे एकूणच वाहनाच्या वजनात ५२ किलोची घट होणार असून, यातील बहुतांश भाग पुढच्या चाकापाशी आहे. चार सिलेंडर एफ टाइपची चपळता वाढण्याचे ते महत्त्वाचे कारण आहे. चासीच्या योग्य काटेकोर ट्युनिंगमुळे नवीन इंजिन अधिक स्टिअरिंग प्रतिसाद, नियंत्रण आणि चालविण्यास आरामदायी ठरणार आहे. चांगल्याप्रकारे ट्यून केलेले अॅक्टिव्ह एक्झॉस्ट हे सुरुवातीच्या एफ टाइप मॉडेलमध्ये आहेच, तर अधिक चांगला ड्रायव्हिंग अनुभव मिळवण्यासाठी आर-डायनॅमिक मध्ये स्वीचेबल अॅक्टिव्ह एक्झॉस्ट आहेत.

जॅग्वार लँड रोव्हर इंडिया लिमिटेडचे (जेएलआरआयएल) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रोहित सुरी म्हणाले, ‘एफ टाइपच्या २.०१ इंजिनच्या सादरीकरणाबाबत आम्ही खूपच उत्सुक आहोत. यामुळे आमचा स्पोर्ट्स कार ब्रँड जॅग्वारच्या चाहत्यांना आणि ग्राहकांना अधिक खुला होईल. स्वतःची आगळीवेगळी ड्रायव्हिंग वैशिष्ट्य जपणाऱ्या खऱ्याखुऱ्या एफ टाईप मुळे उत्साही जॅग्वारप्रेमींना अधिक आनंद होईल अशी आम्हाला खात्री आहे.’

भारतातील जग्वार मालिकेत एक्सई (किंमत ३९.७३ लाख रुपयांपासून पुढे), एक्सएफ (४९.५८ लाख रुपयांपासून पुढे), एफ-पेस (६२.९९ लाख रुपयांपासून पुढे), एक्सजे (११०.३८ लाख रुपयांपासून पुढे) आणि एफ टाइप (९०.९३ लाख रुपयांपासून पुढे) या गाड्यांचा समावेश होतो. या सर्व किंमती एक्स शोरूम आहेत.

जग्वार वाहने भारतात अहमदाबाद, औरंगाबाद, बेंगळुरू, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, कोइम्बतूर, दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, इंदोर, जयपूर, कोलकाता, कोची, कर्नाल, लखनौ, लुधियाना, मंगलोर, मुंबई, नागपूर, नॉयडा, पुणे, रायपूर, विजयवाडा आणि सुरत अशा २७ अधिकृत आउटलेटसमध्ये उपलब्ध आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link