Next
लाव्हाचा अँड्रॉइड ओरिओ (गो एडिशन) स्मार्टफोन
प्रेस रिलीज
Thursday, March 01 | 01:01 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : ‘लाव्हा इंटरनॅशनल लिमिटेड’ या मोबाइल हँडसेट क्षेत्रातील आघाडीच्या भारतीय बहुराष्ट्रीय कंपनीने ‘अँड्रॉइड ओरिओ’वर चालणाऱ्या पहिल्या काही स्मार्टफोनपैकी, ‘लाव्हा झेड ५०’ दाखल केल्याची घोषणा २७ फेब्रुवारी रोजी केली.
 
प्रामुख्याने पहिल्यांदा स्मार्टफोन वापरणाऱ्यांना उत्तम अनुभव मिळावा, यादृष्टीने झेड ५० तयार केला आहे. हा स्मार्टफोन मार्च २०१८च्या मध्यापासून अंदाजे एक लाख रिटेल स्टोअर्समध्ये ब्लॅक व गोल्ड या दोन रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. डिझाइन ते उत्पादन अशा संपूर्ण साखळीवर कंपनीचे पूर्णतः नियंत्रण असून, त्यातूनच लाव्हा २ सीरिजमध्ये उठून दिसणाऱ्या झेड ५०ची निर्मिती झाली आहे. पहिल्यांदा स्मार्टफोन वापरणाऱ्यांचा विचार करून, त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने हा स्मार्टफोन तयार करण्यात आला आहे व त्याला अँड्रॉइड ओरिओचे (गो एडिशन) पाठबळ आहे. 

ग्राहकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी लाव्हा झेड ५० सुसज्ज आहे. जसे डाउनलोड करण्यासाठी व अॅप्लिकेशन स्टोअर करण्यासाठी कमी जागा, मोबाइल अॅप्लिकेशन उघडण्यासाठी अधिक वेळ लागणे, युजर इंटरफेस व कंटेट स्थानिक भाषेत नसणे, हार्डवेअरची गुणवत्ता चांगली नसणे व थर्ड पार्टी अॅप्लिकेशन्सचे प्रमाण अधिक असणे.

लाव्हा इंटरनॅशनलचे उत्पादन विभागाचे प्रमुख गौरव निगम यांनी सांगितले, ‘लाव्हा झेड ५०ला अँड्रॉइड ओरिओचे (गो एडिशन) पाठबळ असून, आम्ही पहिल्यांदाच वेगाने प्रोसेसिंग, अधिक मेमरी असलेले, तसेच युजर्सना डेटा नियंत्रित करणे शक्य होण्यासाठी यूट्युब गो यामार्फत हवा तो कंटेंट मिळण्याची संधी देणारे स्मार्टफोन देत आहोत. कॅमेऱ्यामध्ये ड्युएल बोकेह अनुभव व रात्रीच्या वेळी व्हिडिओ कॉलिंग करण्यासाठी एलईडी फ्लॅशचा समावेश आहे. ग्राहक व ब्रँड या दोन्हींसाठी ही निश्चितच उत्तम संधी आहे.’

अँड्रॉइडचे उत्पादन विभागाचे प्रमुख सागर कामदार यांनी सांगितले, ‘प्रत्येकाला गणनक्षमता देणे, हे अँड्रॉइडचे नेहमी उद्दिष्ट राहिले आहे आणि विविध उपकरणे वापरताना चांगला अनुभव देणे हा त्याचा भाग आहे. मर्यादित मेमरी व प्रोसेसिंग क्षमता असलेल्या स्मार्टफोनमध्ये गुगल व अँड्रॉइड यांची वैशिष्ट्ये समाविष्ट करण्याच्या हेतूने अँड्रॉइड ओरिओची निर्मिती केली आहे. लाव्हा झेड ५० दाखल करून हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकण्यासाठी लाव्हाबरोबर सहयोग करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.’

डिस्प्ले स्क्रीन दणकट व ओरखडेमुक्त असण्यासाठी लाव्हा झेड ५०मध्ये २.५डी कर्व्हड् कॉर्निंग गोरिला ग्लाससह ४.५ इंची डिस्प्ले आहे. त्यास १.१ जीएचझेड क्वाड-कोअरसह मीडियाटेक प्रोसेसरचे (एमटी६७३७एम) बळ आहे व त्यामध्ये आठ जीबी इंटर्नल स्पेस, एक जीबी रॅम आहे. स्मार्टफोनमध्ये ५.५ जीबी वाढीव स्टोअरेज स्पेसही आहे. त्यामुळे उपकरणाची काम करण्याची क्षमता ५० टक्क्यांपर्यंत वाढण्यास मदत होते व अॅप्लिकेशन उघडण्यासाठी तुलनेने अतिशय कमी वेळ लागतो.

लाव्हा झेड ५० मध्ये पाच मेगापिक्सल रिअर व फ्रंट कॅमेरा असून, त्यामध्ये फ्लॅश असल्याने इमेजेस सुस्पष्ट व ठळक येतात. स्मार्टफोनच्या फ्रंट व रिअर या दोन्ही कॅमेऱ्यांमध्ये बोकेह मोड असल्याने क्षण अचूक टिपले जातात व जे टिपायचे आहे, ते स्पष्टपणे उठून दिसते.
भारतातील मोबाइल वापरणाऱ्या व्यक्तींच्या गरजा विचारात घेऊन, या स्मार्टफोनमध्ये भारतातील दहा प्रमुख भाषांचा (हिंदीसह) समावेश करण्यात आला आहे. तसेच, यामध्ये इमेजेस, हवामान शोधता येते.

स्मार्टफोनला दोन वर्षांची वॉरंटी असून, एअरटेलतर्फे दोन हजार रुपयांची आकर्षक कॅशबॅक ऑफरही आहे. लाव्हा झेड ५० दाखल करत असताना, खरेदीच्या तारखेपासून एक वर्षाच्या आत स्क्रीन फुटल्यास, तो एकदा मोफत बदलून देण्याची सवलत जाहीर करण्यात आली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link